जानेवारी महिन्यात या भारतीय क्रिकेटरचा झाला साखरपुडा, आता बायको लवकरच बनणार आई !

437

लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस सीजन ८ ची स्पर्धक आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविकच्या स्पर्धकांसाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर म्हणजे नताशा ने तिचा बॉयफ्रेंड आणि भारतीय संघातील क्रिकेटर असणाऱ्या हार्दिक पांड्या सोबत लग्न केले आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच नताशा ने हार्दिक सोबत साखरपुडा करून सर्वांना आश्चर्य चकित करून टाकले होते. यानंतर या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूपदा वायरल देखील झाले होते. आता या लॉक डाऊन दरम्यान या कपल ने गपचूप लग्न करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या दोघांचे लग्नाचे फोटो तुम्हाला सोशल मीडियावर बघण्यास मिळतील.
हार्दिक पांड्या ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्याच्या लग्नाची खबर आणि फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केले आणि त्यासोबत लिहिले की, माझा आणि नताशाचा आतापर्यंतचा प्रवास हा खूपच शानदार ठरला आहे. आता आम्ही लवकरच आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत. या नव्या आयुष्यासाठी आम्ही दोघेही खूपच उत्सुक आहोत. आम्ही आमच्या जीवनाच्या या वाटेवर खूप खूष आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची आम्हाला गरज आहे.
वायरल झालेल्या फोटोंमध्ये नताशा आणि हार्दिक नवरा-नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत आहेत. तर दुसरा फोटोमध्ये नताशा तिचे बेबी बंप सर्वांना दाखवत असल्याचे दिसते. नताशा आणि हार्दिक दोघेही मागील खूप काळापासून एकमेकांना डेट करीत आहेत. मात्र या गोष्टीची दोघांनी आधी कधी केली नव्हती.
नताशाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने द बॉडी, फुकरे रिटर्न, ॲक्शन जॅक्सन , झिरो, डॅडी, झुटा काही का आणि सत्याग्रह यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने नच बलिये ९ आणि बिग बॉस ८ यांसारख्या रियालिटी शो मध्ये सुद्धा काम केले होते. एवढेच नव्हे तर नताशा बादशहा सोबत डीजे वाले बाबू या लोकप्रिय गाण्यामध्ये सुद्धा दिसली होती. नताशा ही एक मॉडल, डान्सर आणि अभिनेत्री आहे. तिचा जन्म ४ मार्च १९९२ ला सर्बिया मध्ये झाला. तिने सतरा वर्षे नृत्य विद्यालयातून डान्सचे शिक्षण घेतले आणि नंतर सर्बिया मधूनच मॉडेलिंग सुरू केली.

हे वाचा – अखेर समजले, प्रियांकाने या कारणामुळे केले १० वर्ष छोट्या निक सोबत लग्न !

त्यानंतर २०१२ मध्ये मुंबईला येऊन तिने जाहिरातींमध्ये काम करणे सुरू केले. नताशा ने जॉन्सन अंड जॉन्सन, ड्यूरेक्स यांसारख्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती मध्ये काम केले. त्यानंतर २०१४ मध्ये बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. या रियालिटी शोमध्ये टिकण्यासाठी तिने हिंदी भाषा शिकून घेतली.

हे वाचा – किसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते विसरायचा प्रयत्न ! 

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !