प्रियांकाच्या मुलीच्या पायात दिसले असे काही कि सर्व भारतीय म्हणाले आम्हाला गर्व आहे तुझ्यावर !

298

अभिनेत्री प्रियंका चोप्रा बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे. सध्या ती तिची मुलगी मालती मेरी चोपड़ा जोनससोबत वेळ घालवत आहे. मे 2022 ला प्रियंका व तिचा पती निक जोनसच्या घरी या छोट्या परीचे आगमन झाले. त्यांनी सरोगसी पद्धतीने मुलीला जन्म दिला आहे. मालती जन्माला आल्यावर पुढचे 100 दिवस एनआयसीयूमध्ये अॅडमिट होती.

प्रियंका इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते. तिथे तिने तिच्या लेकीची छोटीशी झलक चाहत्यांना दाखवली आहे. 19 जूनला फादर्स डे च्या निमित्ताने प्रियंकाने तिच्या मुलीचा व नवऱ्याचा एक गोड फोटो शेअर केला होता. या फोटोत निक त्याच्या मुलीला हाताला पकडून चालायला शिकवत आहे. तसेच बापलेकीने सारखेच पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहे. मालतीच्या शूजवर MM (मालती मेरी) लिहिले आहे तर निकच्या शूजवर MM चे पापा असे लिहिले आहे. वाईट नजर लागु नये यासाठी मालतीच्या पायात सोन्याचे वाळे सुद्धा दिसत आहे.

बापलेकीचे हे बॉण्डींग पाहून प्रियंकाच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. तिने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, हैप्पी फर्स्ट फादर्स डे माय लव. तुला आपल्या छोट्याशा बाहुलीसोबत पाहुन खूप छान वाटते. घरी परतण्यासाठी किती छान दिवस आहे. आय लव यू. प्रियंकाची ही पोस्ट सगळ्यांना फार आवडली.

एका यूजरने कमेंट करत म्हटले की मुली या नेहमीच वडीलांचा हात धरुन चालायला शिकतात. तर दुसऱ्याने लिहिले की मालती खूप भाग्यवान आहे म्हणून तिला निकसारखे काळजी करणारे वडील मिळाले. तर आणखी एकाने म्हटले की , तू अमेरिकेला जाऊनही तुझे संस्कार विसरली नाहीस, मुलीच्या पायात वाईट नजरेपासून वाचण्यासाठी वाळे घातलेस.

प्रियंका सध्या सिटाडेल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. फादर्स डे ला ती या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करुन घरी पोहचली होती. तिथून परत येतानाचा व्हिडीओ सुद्धा तिने शेअर केला होता. ज्यात ती तिच्या नवऱ्याने गिफ्ट केलेल्या कारमध्ये तिची पेट डायना सोबत दिसत होती. याशिवाय ती बॉलिवूडच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात कैटरीना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !