लॉक डाऊनच्या काळात व्हॉटस्अप ने आणले हे नवीन फीचर !

355

सध्या कोरोना व्हायरसमुळे २१ दिवसांचे लॉकडाऊन पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे घरात बसून करायचे काय हा प्रश्न सगळ्यांना त्रास देत आहे. पण या लॉक डाऊन मुळे कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक खूश खबर आहे. ते म्हणजे सगळ्यांच्या आवडीचे मॅसेंजिंग ऍप तुमच्यासाठी एक नवीन फीचर घेऊन आले आहे. आता घरबसल्या तुम्ही अनेक लोकांसोबत गप्पा मारू शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही ऑफिस मधील व्हिडिओ कॉल सुद्धा या ऍप द्वारे केला जाऊ शकता.

फेसबुकला जोडली गेलेली कंपनी व्हॉटस् अप ने लॉक डाऊन च्या काळात लोकांचा कंटाळा घालवण्यासाठी एका शानदार फीचर ची घोषणा केली आहे. कंपनीने ट्विटर वरुन या नव्या फिचरची घोषणा केली. या मध्ये त्यांनी सांगितले की, आता युजर्स घर बसल्या अनेक लोकांशी संपर्क साधू शकतात. युजर्स व्हॉट्स अप ग्रुप मधील लोकांशी व्हिडिओ चॅट करू शकतात. पण व्हिडिओ चॅट दरम्यान स्क्रीन वर तुम्हाला फक्त ४ लोकच दिसतील. पण चॅट तुम्ही ग्रुप मधील सर्व मेंबर्स शी करू शकता.

व्हॉटस् अप ग्रुप व्हिडिओ चॅट सुरू करण्यासाठी तुम्ही कोणत्याही व्हॉटस् अप ग्रुप वर जा व तेथील व्हिडिओ आयकॉन ला क्लिक करा. त्यानंतर ग्रुप मधील सर्व मेंबर्स ला नोटिफिकेशन जाईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या मर्जीने व्हिडिओ चॅट दरम्यान ज्या व्यक्तीस स्क्रीन वर पाहू इच्छिता त्यांच्या नावावर क्लिक करा. पण त्यावेळी ग्रुप मधील इतर मेंबर्स सुद्धा तुमच्या गप्पा ऐकू शकतात.

दोन दिवसांपूर्वीच व्हॉटस् अप ने वायरल केल्या जाणाऱ्या फेक न्यूज एका पेक्षा अधिक लोकांना सेंड करण्यास पाबंदी लावली. त्या आधी तुम्ही कोणताही मेसेज एकाच वेळी ५ लोकांना एकत्र पाठवू शकत होता. अफवांमुळे निर्माण होणाऱ्या समस्ये पासून वाचण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.