नागपंचमी हा सण का साजरा केला जातो, या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत ? कारण जाणून घ्या !

325

आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक क्षण साजरा करण्यामागे एक कथा आहे. मराठी महिना श्रावण आता सुरु झाला आहे. या महिन्यामध्ये अनेक व्रत, वैकल्य केली जातात सोबतच अनेक सण समारंभ देखील या महिन्यामध्ये येतात.

या महिन्यामध्येच एक सण येतो तो म्हणजे नागपंचमी. हिंदू पंचांगानुसार, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस नागदेवतेच्या पूजेला समर्पित आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

पौराणिक काळापासून नागदेवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की नागाची पूजा केल्याने सापांमुळे होणारी कोणतीही भीती नाहीशी होते. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी देवतांची पूजा केल्याने आशीर्वाद प्राप्त होतात. यावेळी २ ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे.

नाग पंचमी शुभ मुहूर्त – नागपंचमी तिथी प्रारंभ : २ ऑगस्ट सकाळी ०५:१३ पासून , नागपंचमी तिथी समाप्त – ३ ऑगस्ट सकाळी ०५:४१ पर्यंत.

नागपंचमी हा सण का साजरा केला जातो ? पौराणिक कथेनुसार जनमेजय हा अर्जुनाचा नातू राजा परीक्षित यांचा मुलगा होता. जेव्हा जनमेजयाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण स’र्प’दं’श झाल्याचे समजले तेव्हा त्यांनी बदला घेण्यासाठी स’र्प’स’त्र नावाचा य’ज्ञ आयोजित केला.

नागांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींनी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी यज्ञ थांबवून नागांचे रक्षण केले. त्यामुळे तक्षक नागाचा जीव वाचल्याने नागांचा वंश अबाधित राहिला. अग्नीच्या उष्णतेपासून सापाला वाचवण्यासाठी ऋषींनी त्याच्यावर कच्चे दूध ओतले. तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाऊ लागली. त्याच वेळी नागदेवतेला दूध अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.

या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत ? याबद्दल एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे एकदा एक शेतकरी शेतात नांगरट  करत असताना त्याच्याकडून नागिनीची तीन पिल्ले चुकून मृत्युमुखी पडतात  व नागिन चिडते व त्याला चावायला लागते,  तेव्हा  शेतकऱ्याची बायको त्या नागिनीची माफी मागते तिची पूजा करते. नागिन शेतकऱ्याला माफ करते. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत व महिला या नागाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी महिला नटून-थटून नागदेवतेची पूजा करण्यासाठी वारुळाला जातात. तिथे वारुळाला दूध, साळीच्या लाह्यांचा नैवेद्य  दाखवतात. पण काही गावातून मात्र अजूनही  जिवंत नागाची पूजा करतात. त्याला दूध पाजतात. पण दुधामुळे हि नागांना त्रास होतो हे आता शास्त्रीय दृष्टीने सिद्ध झाले आहे.

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांचे स्मरण आणि पूजा केली जाते. त्यामध्ये अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल ही नावे आहेत. या दिवशी घराच्या दारात ८ नागांच्या आकृती बनवण्याची परंपरा आहे. हळद, रोळी, अक्षता आणि फुले अर्पण करून नागदेवतेची पूजा करावी. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळल्यानंतर नागदेवाचे स्मरण करून त्याला ते अर्पण करावे. आपल्या गावांमध्ये घरोघरी नागदेवतेची पूजा करत नागपंचमी साजरी केली जाते.

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.