Headlines

वीर मराठा शोले…जे बॉलिवूड इंडस्ट्रीला वर्षांनुवर्षे जमलं नाही ते साऊथ इंडस्ट्रीने केलं, बघा !

भारताचा आजतायगतचा सुपरहिट चित्रपट म्हणुन बाहुबलीचे नाव अग्र स्थानावर असते. या चित्रपटाने आतापर्यंतचा सर्व रेकॉर्ड ब्रे़क केला आहे. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले. पहिल्या भागाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडे सुद्धा प्रेक्षक अगदी डोळे लावुन बसले होते.पहिल्या भागा प्रमाणे दुसऱ्या भागाला सुद्धा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट एस. एस. राजामौली यांनी प्रदर्शित केला होता. आता एस.एस.राजामौली यांचा RRR हा चित्रपट २५ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात त्यांनी भारताचा इतिहास उत्कृष्ट पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांना या चित्रपटातील स्टारकास्ट दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांची साथ लाभली.विशेष म्हणजे या दोघांसोबत बॉलिवुडची बबली गर्ल आलिया भट्ट सुद्धा प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

या चित्रपटात रामचरणने स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ यांची भूमिका साकारली आहे. तर, ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’ यांची भुमिका साकारली आहे. राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण ही तिघेही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिगग्ज कलाकार पण या चित्रपटात एक असे गाणे आहे ज्यामुळे समस्त शिवभक्तांची ,महाराष्ट्राची मान मानाने उंचावली जाईल. नुकतंच या सिनेममधील ‘शोले’ हे गाणं प्रदर्शित झालं.

या गाण्याला अवघ्या २४ तासात युट्यूबवर ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘वीर मराठा शोले’असे या गाण्यात बोल आहेत. ज्यातुन देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांना मानवंदना दिली आहे. तर महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार केला आहे. हे गाणे पाहुन छत्रपती शिवाजी महाराजांप्रति अभिमान वाटत असल्याच्या कमेंट या गाण्यासाठी आल्या आहेत. तर एकाने या गाण्याला मास्टर पिस असे देखील म्हटले आहे.

गेली ३ वर्षे RRR या चित्रपटाचे शुटींग चालु आहे. दक्षिणेसोबतच जगभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणी यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.सुरुवातीला हा चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं त्यामुळे आता येत्या २५ मार्च रोजी हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !