Headlines

सध्या ट्रेंड होणारी ज्ञानदा कदम आहे तरी कोण, वाचा तिचा जीवनप्रवास !

मित्रांनो आजकाल तुम्हाला सोशल मीडिया वर काय सांगशील ज्ञानदा? नावाचे ट्रोल्स आणि मिम्स ट्रेंड होताना दिसत असतील. तुमच्यापैकी एबीपी माझा बघणार्यांना माहितीच असेल ज्ञानदा कदम एबीपी माझा ह्या लोकप्रिय न्यूज चॅनेल ची वृत्तनिवेदिका आहे. ज्ञानदा ची अनोखी शैली, तिचा मधुर आवाज, बोलण्यातला आत्मविश्वास लोकांना खूप भावतो. तिच्या ह्याच कौशल्यांमुळे ती आज लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचली आहे. राजीव खांडेकर, उदय निरगुडकर, निखिल वागळे, प्रसन्न जोशी, भूषण करंदीकर अमित चव्हाण ह्यांसारख्या अनुभवी वृत्तनिवेदकांच्या पंक्तीमध्ये बसत ज्ञानदाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
काय सांगशील ज्ञानदा ची सुरुवात कशी झाली? एबीपी माझाचेच वृत्तनिवेदक आणि ज्ञानदा चे सहकारी प्रसन्न जोशी निवेदन करताना ज्ञानदा चे मत विचारण्यासाठी, अपडेट्स घेण्यासाठी त्याच्या शैलीमध्ये काय सांगशील ज्ञानदा? हा प्रश्न विचारत असतो. हीच ओळ निवडून ट्रोलकर्यानी ज्ञानदाला विविध प्रश्न विचारून ट्रेंड करायला सुरुवात केली आणि एक एक भन्नाट मिम्स आणि जोक्स तयार केले.
फेसबुक वर ह्या साठी खास पेज ही तयार केले गेले आणि लवकरच ज्ञानदाचा फॅन बेस ही वाढला. ह्याच ट्रोल्स ना उत्तर म्हणून ज्ञानदा ने काय सांगशील ज्ञानदा? हा वेगळा शो ही प्रसूत केला आणि त्याद्वारे कोरोना वायरस बद्दल जागरूकता निर्माण केली.
कसा होता ज्ञानदा चा वृत निवेदिका बनण्यापर्यंतचा प्रवास? – ज्ञानदा कदम ह्यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रातील सुरुवात काही महिने आकाशवाणी आणि प्रिंट मीडिया मध्ये काम करण्यापासून केली. त्यानंतर २००७ मध्ये एबीपी माझा मध्ये रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली. सुरुवातीला शैक्षणिक क्षेत्रात रिपोर्टिंग करून स्वतःला सिद्ध केले. रिपोर्टींग मध्ये जम बसल्यानंतर ज्ञानदाकडे अँकरिंग करण्याची संधीही चालून आली. सुरवातीला फक्त रविवारी अँकरिंग करणारी ज्ञानदा आज दररोज अनेक शो सादर करते. सध्या ती पूर्णवेळ अँकरिंगचं करते. ज्ञानदा तुम्हाला “मॉर्निग ब्रेकफास्ट” ह्या शो मध्ये न्यूज बुलेटिन घेऊन सकाळच्या बातम्या सादर करते. हुंड्याला विरोध, माझी शाळा, दुष्काळ परिषद, महापूर ह्यासारख्या संवेदनशील विषयांवर ज्ञानदाने सादरीकरण करून न्याय दिला आहे. तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या काळात केलेला “रणसंग्राम रणरागिणींचा” हा शो ही लोकप्रिय होता.
काय सांगशील ज्ञानदा हे ट्रेंड होत असतानाच काही लोकांनी एका मर्यादेपलीकडे जाऊन अनेक लोकांनी आक्षेपार्ह पोस्ट ही टाकल्या. ह्या सर्वांकडे दुर्लक्ष करत ह्या सर्व ट्रोल्स ना उत्तर म्हणून एक शो सादर केला त्यात ती म्हणते, “जगभरातील परिस्थिती आपण पाहतोय, इटलीत काय झालय स्पेन मध्ये काय झालंय, जर्मनी कुठल्या संकटातून जातेय, अमेरिका असो किंवा इतर बाकीचे देश, कोरोनाचे संकट हे महाभयंकर आहे ते अतिशय गांभीर्याने घ्यायला हवय म्हणून सरकार हि प्रयत्नशील आहे पण तुमची आमची साथ यंत्रणेला मिळणं फार गरजेचं आहे.
घराबाहेर अजिबात पडू नका अस ज्ञानदा तुम्हाला सांगतेय. तुमच्या स्वच्छतेची काळजी घ्या, हात वेळोवेळी साफ करा आणि जर तुम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असाल तरच तुम्ही घराबाहेर पडा, कारण तुम्ही जर तुमची काळजी घेतली नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो, सरकारी सूचनांचे पालन करा असं निवेदन ज्ञानदा ने केलंय तरीही तुम्हाला अजून काही ज्ञानदाला विचारायचं असेल तर बिन्दास्त कमेंट करा”. ह्याचा व्हिडीओ तुम्ही एबीपी माझा च्या यूट्यूब चॅनेल वर पाहू शकता.
मित्रांनो लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *