Headlines

सोशल मीडिया वर ट्रेंडिंग असणारी ‘ज्ञानदा कदम’ नुकतीच अशी झाली या आजारातून मुक्त !

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीवरील सर्वात लोकप्रिय वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम चव्हाण ही काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह होती. पण आता मी ज्ञानदाने कोरोनाला हरवला आहे आणि ती पूर्ण बरी झाली असून तिला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ती लवकरच पुन्हा एकदा एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर दिसेल. ज्ञानदा चव्हाण ही मराठी वृत्तवाहिन्यांवरील सर्वात लोकप्रिय वृत्तनिवेदिका आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा काय सांगशील ज्ञानदा हा कार्यक्रम एबीपी माझावर खूप लोकप्रिय झाला होता. त्यानंतर तिच्यावर अनेक मीम ही बनू लागले तसेच तिच्या नावावरून अनेक सोशल मीडिया पोस्ट सुद्धा बनू लागले. यादरम्यान तिच्या फॉलोवर्स च्या संख्येत असंख्य पटीने वाढ झाली. पण गेले काही दिवसांपासून ज्ञानदा एबीपी माझा वर दिसली नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला होता की महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तनिवेदिका टीव्हीवर का दिसत नाही? या सर्वांचे उत्तर स्वतः ज्ञानदा ने दिले आहे. तिला कोरोना ची लागण झाल्याचा खुलासा तिने केला.
ज्ञानदा ने सांगितले कि जेव्हापासून लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली होती तेव्हापासून ती वर्क फ्रॉम होम काम करत होती मात्र माझा कट्टा किंवा कोणतीही मोठी पत्रकार परिषद यासाठी तिला आठवड्यातून एकदा ऑफिसला जावे लागायचे. त्यामुळे ती २२ मे ला तिच्या ऑफिसमध्ये गेली होती. घरी आल्यावर मात्र तिला थोडाफार त्रास जाणवू लागला. तिला त्यावेळी जेवणाची चव समजत नव्हती ,अंगदुखी चा त्रास जाणवू लागलेला मात्र नंतर हळूहळू तिला ताप येऊ लागला म्हणून तिने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली त्यावेळी डॉक्टरांनी तीला कोरोनाची टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी असे सांगितल्यावर टीव्हीवर खंबीरपणे वावरणारी ज्ञानदा त्याक्षणी थोडीशी घाबरली. तिने सांगितले की आपण टीव्हीवर कितीही खंबीरपणा दाखवला तरीही स्वतः एक माणूस असतो इतर माणसांप्रमाणेच मला देखील भावना असल्यामुळे या सर्व गोष्टींचा अनुभव घेताना मला देखील भीती वाटली. कारण ज्या गोष्टी टीव्ही च्या स्क्रीनवर पाहिल्या होत्या त्या सर्व आता स्वतः अनुभवत होते.
कोरोना ची चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट हाती येईपर्यंत काळ हा खूप कठीण असल्याचे ज्ञानदा सांगते कारण आपल्याला नक्की ठाऊक नसते आपल्याला कोरोन झाला आहे की नाही. त्यामुळे घरात इतरांसोबत कसे वावरावे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रिपोर्ट येईपर्यंत तिने स्वतःला एका खोलीत आयसोलेट करून घेतले होते. बेडरूम ते तिच्या बुलेटीन साठी लागणारी रुम पर्यंतच तिने घरात वावर ठेवला. घरात शिंकणे खोकणे टाळले. तोंडावर सतत मास्क ठेवला. तिने घरच्यांशी संपर्क थांबला कारण तिचे सासू-सासरे हे साठी पार असल्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक होते. ज्ञानदा ने सांगितले की रिपोर्ट हाती येईपर्यंत तिच्या घरच्यांनी तिला खूप खंबीरपणे पाठिंबा दिला. रिपोर्ट काहीही असू देत तुला लवकर बरी व्हायचे आहे असे सतत तिच्या मनावर बिंबवत राहिले. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर २७ मे ला ज्ञानदा तिच्या घराजवळ असलेल्या आर आर हॉस्पिटल मध्ये भरती झाली.
घरातून निघताना फक्त डॉक्टरांचे सल्ले फॉलो करायचे आणि स्वतःला सतत सकारात्मक ठेवून या आजारावर मात करायची एवढेच तिने ठरवले होते. इतके दिवस एक वृत्तनिवेदिका म्हणून अनुभव आल्यानंतर आता स्वतः या गोष्टीला सामोरे जातानाच्या आठवणी सांगताना ज्ञानदा ने सांगितले की, तिला आर आर हॉस्पिटल मध्ये एका स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. ज्ञानदा ला तिथे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या गोळ्यांचा कोर्स करयला दिला होता. टीव्हीवर खंबीरपणे बातम्या देणारी ज्ञानदा त्याकाळात स्वतः खूप घाबरुन गेली त्यावेळी तिच्या डॉक्टरांनी तिला खूप खंबीरपणा दिल्याचे ती सांगते. डॉक्टरांनी तिला मोलाचा सल्ला दिला होता तो तुम्हाला जो कोरोना झाला आहे तो शारीरिक झाला आहे मात्र तुमच्या मनाला कोरोना होऊ देऊ नका. तुम्ही जितके सकारात्मक राहाल, जितक्या खंबीर राहाल आणि विसराल की तुम्हाला कोरोना झाला आहे तितकच तुमच्यासाठी चांगले असेल आणि तुम्ही यातून सुखरूपपणे बाहेर पडू शकाल. हॉस्पिटल मधील डॉक्टरांसोबतच इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा तिची कोरोना बद्दलची भीती घालवल्याचे ती प्रामुख्याने सांगते. आयुष्यातील खरे सुपरहिरो हे आरोग्य विभागाचे डॉक्टर्स आणि आणि इतर सदस्य असल्याचे ती सांगते. कारण ते स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी सतत झटत असतात.

त्यानंतर पाच दिवसांच्या औषधांच्या कोर्सनंतर ज्ञानदा ची प्रकृती झपाट्याने सुधारू लागली. या काळातील आठवणी सांगताना ज्ञानदा ने विशेष नमूद केले की हॉस्पिटलमध्ये तिला इतर पेशंट प्रमाणेच ट्रीटमेंट मिळाली. टीव्हीवरील ती नामांकित चेहरा असली तरीही डॉक्टरांनी तिला इतर पेशंट प्रमाणेच हाताळले. इतर रुग्णांमध्ये आणि माझ्यात कधीच दुजाभाव केला नाही. त्यामुळे जे जेवण इतर पेशंट न मिळत होता तेच तिला देखील मिळत असल्याचं तिने सांगितलं विशेष म्हणजे तेच जेवण डॉक्टर सुद्धा जेवायचे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये सर्वांना समान वागणूक दिली जात असल्याचे ज्ञानदा म्हणते.

हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर तिने मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. कामाच्या सतत व्यापात वाचन कुठेतरी कमी पडत असल्यामुळे तिने मिळालेल्या वेळेचा फायदा करून घ्यायचे ठरवले त्यासाठी ती मोबाईलवरील ॲप मधून वाचन करायची हे वाचन करताना देखील ती डोक्याला ताण येणार नाही असेच हलके-फुलके वाचन करायची. तसेच या दरम्यान तिने अनेक मराठी वेब सिरीज पाहिल्या. मोबाईलवर चित्रपट पाहिले. मित्र-मैत्रिणींचे , कुटुंबातील इतर सदस्यांचे शुभेच्छा देण्यासाठी सतत फोन मेसेजेस येत होते त्या वेळी त्यांच्यासोबत बोलण्यात वेळ घालवला. इतके दिवस कामाच्या व्यापात झोप अपुरी पडत होती त्यामुळे तिने स्वतःची झोप देखील पूर्ण करून घेतल्याचे ती सांगते. तसेच इतके दिवस शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे मिळालेल्या वेळेत प्राणायाम व वेगवेगळे व्यायाम केले. हळूहळू प्रकृती सुधारल्यावर तिला ६ जून ला डिस्चार्ज मिळाला.
या काळात तिला तिच्या मित्र-मैत्रिणीं, ऑफिसमधील सहकारी आणि कुटुंबीयांसोबत तिच्या बिल्डींग मधील सदस्यांनी सुद्धा खूप पाठिंबा दिला तसेच मदत देखील केल्याचे तिने सांगितले आणि या सर्वांचे आभार ज्ञानदाने मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *