ही अभिनेत्री मराठी मालिका विश्वात कमवतेय जबरदस्त नाव, जाणून घ्या कोण आहे ती !

361

अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांमध्ये स्वतःचे बालपणीचे वा जुने फोटो शेयर करताना पाहिलं. त्या कलाकारांच्या चाहत्यांना हे फोटो फारच आवडले. अनेकांनी कोलाज, पूर्वी – आता असे तयार करून फोटो पोस्ट केले. तसाच एक फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो एका अभिनेत्रीचा असून पूर्वी ती अभिनेत्री अशी दिसत असे हे पाहून कुणाला खरंच वाटेना. तर हा फोटो आहे रुपाली भोसले या अभिनेत्रीचा.

रुपालीने हा पूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो असा एडिट करून तिने हा फोटो पोस्ट केला. या पोस्टसाठी तिने कॅप्शन मध्ये लिहले आहे की, अरे देवा, ही मुलगी तर खूप दूर पर्यंत आली आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचे मी आभार मानते आणि ज्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला त्यांचे ही आभार. माझ्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती मी स्वतः होती आणि स्वत: वर विश्वास ठेवणं हे सर्वात महत्वाच आहे. खूप मोठा प्रवास आहे आणि त्यात अडथळे देखील येणार आहेत. पण कशाची ही खंत नाही..आता घडणाऱ्या गोष्टी या आधी सारख्या नक्कीच नाहीत, पण लढण्याची जिद्द अजूनही तशीच आहे. स्वप्न देखील तिच आहेत.”असे रुपाली म्हणाली.

रुपालीने मराठी मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कामं केलं आहे. फार पूर्वीपासून ती मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना दिसत आहे. २००९ मध्ये मन उधाण वाऱ्याचे या स्टार प्रवाहवरील मालिकेतून तिने अभिनयाला सुरुवात केली. दोन किनारे दोघी आपण, कन्यादान, शेजारी शेजारी पक्के शेजारी, दिल्या घरी तू सुखी राहा, स्वप्नांच्या पलीकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, या गोजिरवाण्या घरात, गाणे तुमचे आमचे अशा एकापेक्षा एक आणि गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

त्यानंतर दूरदर्शन वरील महासंग्राम, तुझं माझं जमेना, टी टाईम, आयुष्मान भव अशा कार्यक्रमांमध्ये देखील तिने काम केले. २०१९ च्या बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये ती स्पर्धक होती. फक्त मराठीच नव्हे तर कसमे वादे, बडी दूर से आये है, तेनाली रामा अशा हिंदी मालिकांमध्ये देखील तिने काम केले. २००७ मध्ये तिने “रिस्क” नावाचा हिंदी चित्रपट देखील केला.

सध्या रुपाली स्टार प्रवाहवरील सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका “आई कुठे काय करते?” या मालिकेमध्ये संजना या पात्राची भूमिका साकारताना दिसत आहे. तिची खलनायकी भूमिका सर्वच प्रेक्षकांना फार आवडली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !