घरच्या घरी ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी आणि पेशंटचा जीव वाचवण्यासाठी हे करा, आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती !

285

कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडतो न पडतो कोरोनाची दुसरी लाट येऊन आदळली. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या देशामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. ऑक्सिजनची कमतरता भाऊ लागल्यामुळे जिथे तिथे हाहाकार उडाला आहे. हॉस्पिटलच्या बेड उप्लब्धतेसोबतच कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची देखील मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे.

ऑक्सिजनची वेळेत उपलब्धता होत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. ही भयानक स्थिती पाहून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रोनिंगचे काही साधे प्रकार सुचवले आहेत. हे प्रोनिंगचे प्रकार केल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल सुधारू शकते.

प्रोनिंग कसे करावे – रुग्णाला उपडी स्वतःच्या पोटावर झोपवावे. मानेच्या खाली एक उशी ठेवावी. त्यानंतर एक किंवा दोन उश्या छाती व पोटाच्या खाली व्यवस्थित ठेवाव्यात आणि दोन उश्या पायाच्या पंजाच्या खाली ठेवाव्या. अर्धा तास ते २ तासांपर्यंत याच स्थितीत झोपून राहावे. उपडी झोपलेलय स्थितीच उजव्या डाव्या कुशीवर परतत राहावे.

त्यानंतर रुग्णाला उठवावे व उपडी झोपवावे. या प्रक्रियेमुळे फुफ्फुसांमध्ये र*क्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होते आणि फुफ्फुसांमधील फ्लुइड इकडे तिकडे सरकले जाते, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन सहजरित्या पोहोचतो. सोबतच ऑक्सिजन लेव्हल ढासळत नाही.

प्रोनिंग म्हणजे काय – आरोग्य मंत्रालयच्या मते, प्रोनिंग हा एक असा प्रकार आहे, ज्याच्याधारे रुग्ण स्वतःची ऑक्सिजन लेव्हल स्वतः सुधारू शकतो. ऑक्सिनिझेशन तंत्रामध्ये हि प्रक्रिया ८०% प्रभावी ठरते. ही प्रक्रिया करण्यासाठी रुग्णाने उपडी पोटावर झोपावे. वैद्यकीयदृष्ट्या देखील हे सिद्ध झाले आहे की, प्रोनिंग केल्याने श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो.

घरीच आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना प्रोनिंग करणे अधिक फायद्याचे ठरते. प्रोनिंगची स्थिती सुरक्षित असून, र*क्तामधील ऑक्सिजन लेवल बिघडल्यास या स्थितीद्वारे ते नियंत्रणात आणता येते. आयसीयुमध्ये देखील असलेल्या रुग्णांना प्रोनिंगमुळे आराम मिळाल्याचे दिसते. व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्यास प्रोनिंग करणे अधिक प्रभावी ठरते.

प्रोनिंग केव्हा करावे – जेव्हा कोरोना झालेल्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तेव्हा प्रोनिंग करावे आणि ऑक्सिजन लेवल ९४% कमी होईल तेव्हा करावे. जर रुग्ण घरीच आयसोलेशनमध्ये असेल तर त्याने स्वतःची ऑक्सिजन लेवल चेक करत राहावी, सोबतच ताप, ब्ल*ड प्रेशर, ब्ल*ड शुगर देखील तपासावे. योग्य वेळीच प्रोनिंग केल्याने कित्येक लोकांचे प्राण बचावले आहेत.

या स्थितीमध्ये प्रोनिंग करू नये – जेवून झाल्या झाल्या प्रोनिंग करू नये. जेवणानंतर कमीत कमी १ तासानंतर हि प्रक्रिया करावी. जर आपण प्रेग्नेंट असाल तर प्रोनिंग करू नये. गंभीर कार्डिएक स्थिती असेल किंवा स्पायनलशी संबंधित एखादा आजार असेल, फ्रॅक्चर असेल, अशावेळी प्रोनिंग करू नये. अशा स्थितींमध्ये प्रोनिंग केल्याने आपल्याला नुकसान मिळू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.