सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने आरोग्यास मिळतील हे जबरदस्त फायदे, वाचून आजच सुरु कराल खायला !

805

तुळशीचे रोप अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या घरी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः लोक या रोपाचे पूजा पाठ करण्यासाठी घरासमोर लावतात. हिंदू धर्मामध्ये तुळशीला देवी स्वरूप मानले गेले आहे. या कारणामुळे तुळशीला पवित्र सुद्धा मानले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का धार्मिक महत्वाशिवाय तुळशीचे आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा आहेत, जे मानवी शरीराला खूपच लाभदायी ठरतात.

आयुर्वेदानुसार तुळशीमध्ये हे खूप सारे पोषक गुणधर्म उपलब्ध असतात तसेच औषधीय गुणधर्म सुद्धा उपलब्ध असतात म्हणूनच जर तुळशीचे योग्य पद्धतीने उपयोग केल्यास तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहील आणि तुम्हाला आरोग्याच्या संबंधित निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांपासून लवकरच मुक्तता मिळेल.

उपाशीपोटी तुळशीच्या पानांना खाल्ल्यास अनेक आजारांपासून सुटका मिळते.चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या पानांचे कोणकोणते लाभ आहेत.

तुळशीच्या पानांना खाण्याचे फायदे – सर्दी खोकला बरे करते
जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला सारख्या समस्या होत असतील तर तुळशीचे पान खाणे तुमच्यासाठी फायदेमंद सिद्ध होऊ शकते. तुळशीच्या पानांमध्ये हे अँटीबॅक्टरियल गुण असतात, जे सर्दी-खोकला निर्माण करणाऱ्या विषाणूंना रोखतात आणि त्यांना नष्ट करतात. फक्त तुळशीचे पान खाल्ल्याने किंवा तुळशी आणि हळद युक्त दूध प्यायल्याने सुद्धा तुम्हाला लवकर लाभ होईल.

पचनसंस्था सुधारते – अपचन, गॅस सारख्या समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी तुळशी रामबाण उपाय ठरते. तुळशीच्या पानाचे सेवनाने फक्त अपचन सुधारत नाही तर पोटामध्ये होणारी जळण सुद्धा शांत होते. तुमच्या शरीराची पीएच लेवलला नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते.

तणाव दूर करते – जर तुम्ही नेहमी तणावामध्ये राहत असेल आणि तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी उपाशीपोटी तुळशीचे तीन चार पाने चावल्याने फरक पडतो. तुळशीच्या पानांमध्ये अडप्टोजन असते जे आपल्या नर्वस सिस्टमला नियंत्रण करण्याचे कार्य करत असते, यामुळे तणाव कमी होतो आणि र*क्ताभिसरण व्यवस्थित राहते.

श्‍वासाची दुर्गंधी दूर करते – श्वासांमध्ये येणारी दुर्गंधी यामुळे अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे तोंडाच्या स्वच्छतेसाठी नुकसानदायी ठरते, अशामध्ये जर तुम्ही नियमितपणे तुळशीची पाने चावून खाल्ल्यास किटाणू नष्ट होतील. हे किटाणू दुर्गंधी श्वास निर्माण करण्यामागे कारणीभूत असतात.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते – तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सक्षम असेल तर शरीर रोगाला लवकर नष्ट करते. रोगप्रतकारकशक्ती वाढवण्यासाठी तुळशी तुमची मदत करू शकते.

तुळशीमध्ये एंटीऑक्सीडेंट आणि अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे तुमच्या रोग प्रतिकारक्षमतेला मजबूत बनविण्याची कार्य करते यासाठी तुम्हाला रात्री पाण्यामध्ये तुळशीची काही पाने टाकून ठेवा आणि सकाळी त्यांना उपाशीपोटी खा यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

तर मित्रांनो हे होते तुळशीच्या पानाचे काही विशेष लाभ. जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर आजच लावा सोबतच तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.