Headlines

तुम्ही पीत असलेले दूध ए १ आहे कि ए २? , काय फरक आहे ए १ आणि ए २ दुधामध्ये, जाणून घ्या बाळाच्या शरीरावर होणारे परिणाम !

दूध हे किती महत्त्वाचे असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शरीरास पोषक घटक मिळण्यासाठी दुधाचे सेवन करणे महत्त्वाचे असते. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणात असतात. दुधामध्ये लॅक्टोज, फॅट, अन्य विटामिन्स आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक असतात. दुधाचे दोन प्रकार असतात हे तुम्हाला माहीत आहे का? दुधाचे प्रोटीन आणि केसिन प्रोटीन असे दोन प्रकार असतात. केसीन प्रोटीन सुद्धा दोन प्रकारचे असते, अल्फा केसीन आणि बेटा केसीन. दुधामध्ये असलेल्या प्रोटीन सर्वात मोठा घटक हा केसिन चा असतो. दुधामधील एकूण प्रोटीन पैकी ८०% प्रोटीन हे केसिन प्रोटीन असते.

बीटा केसीन बद्दल बोलायचे झाल्यास बीटा केसिनचे देखील दोन प्रकार असतात ते म्हणजे ए१ आणि ए२. तुम्ही ए१ आणि ए२ बद्दल ऐकले असेल. ए१ आणि ए२ दूध वेगवेगळे असते का? यातील फरक काय? हे दूध वेगवेगळ्या गायी देतात का? या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला आज या लेखाद्वारे सांगणार आहोत.

आजच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर ए१ आणि ए२ या दुधावर संशोधन होत आहे. या दोन्ही दुधामध्ये फरक असतो. रशिया अमेरिका, भारत यांसारख्या सर्व देशातील नागरिक दूध पितात. लहान मुलांच्या न्यूट्रिशियन साठी दूध महत्त्वाचे असते. मार्केटमध्ये दोन प्रकारचे दूध मिळते ए१ आणि ए२ – ए१ दूध ए१ टाईप ची गाय देते आणि ए२ दूध ए२ टाईप ची गाय देते. या दोन दुधामध्ये तुलना करायची झाल्यास भारतासह इतर देशात ए१ दूध जास्त वापरले जाते. त्यामानाने ए२ दुधाचा खप कमी आहे.
प्राचीन ब्रीडच्या गाईपासून ए२ दूध मिळते. प्राचीन ब्रेड म्हणजे देशी गाय देखील म्हणू शकतो. ए१ दूध फॉरेन ब्रीड च्या गाईपासून मिळते. या गाई मिक्स रेसच्या असतात. आधी सांगितल्याप्रमाणे दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटिन्स असतात. काय झालं प्रोटिन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यातीलच एक प्रकार म्हणजे केसिन. हे प्रोटीन दुधामध्ये सर्वाधिक असते. म्हणजेच दुधात एकूण ८०% केसीन प्रोटीन असते.

देशी गाय जी ए२ दूध देते त्यामध्ये केसीन प्रोटीन सोबतच एक खास प्रकारचे अमिनो ऍसिड सुद्धा असते. याला प्रोलीन असे म्हणतात. अमिनो ऍ’सि’ड आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. भारतात ए१ गाई जास्त असतात. या गाईंना हायब्रीड गाई असे देखील म्हणतात. ए१ गाईच्या दुधामध्ये एक वेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड असते. या ऍ’सि’ड ला हि’स्टी’डा’ई’न असे म्हणतात.
या सर्वांमध्ये अमिनो ऍसिड ची मोठी भूमिका असते. ती कशी ते पाहूया – 
ए२ दुधामधून जे रोलिंग मिळते ते आपल्या शरीरात बीसीएम ७ जाण्यास रोखतात. परंतु तुम्हाला बीसीएम ७ म्हणजे काय ते माहित आहे का? (Beta- Casomorphin-7) बीसीएम ७ हे एक ओपीओइड पेप्टाइड असते. हे एक छोटेसे प्रोटीन आहे जे आपल्या शरीरात पचत नाही. या प्रोटीनमुळे अपचन होते. संशोधनातून असे दिसून आले की या मुळे मधुमेहासारखे आजार देखील होतात. ए१ गाय प्रोलीन बनवत नाही. त्यामुळे आपल्या शरीरात बीसीएम ७ जाऊन ते हळूहळू र’क्ता’त मिसळते.

बीसीएम ७ प्रोटीन ए२ दूध देणाऱ्या गाईंच्या युरीन, र’क्ता’त मिळत नाही मात्र हे प्रोटीन ए१ गाईच्या दुधात सापडते. त्यामुळेच ए१ दूध पचण्यास जड जाते.

बीसीएम ७ आपल्या शरीरास किती धोकादायक आहे?
ए२ दूध पचण्यास हलके असते असे काही संशोधनातून दिसून आले. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ने दिलेल्या रिपोर्ट नुसार ए१ बीटा केसिन वाल्या दुधात बीसीएम ७ असते. जर असे दूध लहान मुलांना दिल्यास त्यांच्यात मधुमेहाचा धोका वाढतो.

हे संशोधन स्कॅन्डिनेवियन आणि नीदरलैंड मध्ये केले गेले होते. ज्या लोकांमध्ये मधुमेहाची समस्या असते अशा लोकांच्या लाइफस्टाइल सोबतच ए१ दूध त्या मधुमेहास काही अंशी जबाबदार असते. या दुधामुळे हृदयविकाराचा धोका देखील संभावतो.

रशियातील संशोधकांच्या मते बीसीएम ७ लहान मुलांच्या रक्तात जाते आणि ते मेंदूतील मासपेशांमध्ये होणाऱ्या विकासास बाधा निर्माण करते. हा रिसर्च इंटरनॅशनल जर्मन पेप्टाइड्सने प्रसिद्ध केला होता. इंडियन जर्नल ऑफ इंडॉक्रिनोलॉजी अंड मेटाबोलिजम ‌२०१२ नुसार मधुमेह टाईप १ चा‌ ए १ दुधाशी संबंधित असतो.

यामुळे हृदय विकार, मेंटल दिसोर्डर, ऑटिझम, एलर्जी यांसारखे आजार उद्भवतात. हे सर्व बीसीएम ७ र’क्ता’तून मेंदूत गेल्यामुळे होते. ए१ दूध घेतल्यामुळे काहीही नुकसान होत नाही. हे दूध शरीरास हानी पोहोचवत नाही. भारतात लोकसंख्या वाढल्यास दुधाची कमी पडू नये यासाठी १९७० नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने भारतात ऑपरेशन फ्लडला सुरुवात केली होती.

दुधाच्या उत्पादनात वृद्धि व्हावी, ग्रामीण उत्पादनांना चालन द्यावे, आणि उपभोक्त्याला उचित मूल्यात दूध मिळावे या उद्देशाने विदेशी संकर प्रजातींच्या आयाती सोबत क्रॉस प्रजननचा उपयोग केला. यामुळे भारतात देशी गाईंची कमी नाही.
आता तुम्हाला कळले असेल की ए१ आणि ए२ दुधात काय फरक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !