मराठी अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’ न्यू*ड सीन द्यायला तयार पण … घातली ही एक अट, जाणून घ्या !

208

झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीने तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम भाषिक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. १९९९ मध्ये “प्यार कोई खेल नही” या हिंदी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. दिवाने, तुमसे अच्छा कौन है, देवदास या सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

शर्यत, बाळकडू, नटसम्राट या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे. चित्रपटातील काही आयटम सॉंग्सवर देखील तिने नृत्य सादर केले आहे. सध्या ती “भाबीजी घर पर है” या मालिकेत अनिता भाभीची भूमिका ती साकारत आहे. नेहाने गेल्या वर्षीच शार्दूल बियास यांच्यासमवेत मराठमोळ्या पद्धतीत लग्न केले. नेहा ही नेहमीच तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींसाठी चर्चेत असते.

हल्लीच ई – टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. कलाकार हे चित्रपट तसेच मालिकांमध्ये वास्तवता दाखवण्यासाठी आपल्या अभिनयामध्ये बदल हे करत असतात. कधी नायक कधी व्हिलन तर कधी अजून इतर भूमिका हे कलाकार सादर करत असतात. ज्याप्रमाणे एखाद्या सिनची आवश्यकता असेल त्याप्रमाणे तसे सिन हे चित्रित करावे लागतात अकारण तशी कथानकाची गरज असते. यापैकीच एक असतो तो बोल्ड किंवा न्यू*ड सीन.

या विषयी नेहाला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले असता, ती म्हणाली, “मी भविष्यात न्यू*ड सीन किंवा बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही पण, मी कधीही अशा चित्रपटांचा भाग होणार नाही ज्यात फक्त आणि फक्त किसिंग सीन असतील. अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड किंवा न्यू*ड सीन्स दाखवले जातात पण त्या निर्मात्यांनी व दिग्दर्शकांनी ते तसे व्यवस्थित हाताळले देखील आहेत. तसे व्यवस्थित हाताळले तर मी बोल्ड किंवा न्यू*ड सीनच्या विरोधात नाही, हि प्रत्येकाच्या दृष्टीकोनाची बाब आहे आणि नक्कीच मी चांगल्या कामासाठी तयार आहे.

” यापुढे ती म्हणाली, “मी ज्यावेळेस एका निश्चित वयात होते तेव्हा मला असं वाटायचं की, किसिंग सिन किंवा बोल्ड सिन नसतील तर तो चित्रपट किंवा आशय हिट ठरणार नाही, पण जागतिक व चांगले काही सिनेमे पाहिल्यावर मला आता मला वाटतं की, जर माझ्याकडे टॅलेंट आहे तर मी माझ्या अभिनयाद्वारे हे दाखवू शकते. या मुलाखतीदरम्यान बोलताना तिने पूर्णपणे प्रेमावर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्ती केली आहे.

यानंतर लॉकडाऊन बद्दल बोलताना ती व तिचा पती घरी वेळ कसा घालवतात याबद्दल तिने सांगितलं, “माझं स्वतःचं आयुष्य हे मिनी लॉकडाऊन आहे, त्यामुळे मला फारसा फरक पडला नाही. परंतु शार्दूल हा एक बिजनेसमॅन असल्याने त्याच्यावर याचा परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे आमच्या नात्यात अधिक मॅच्युरिटी आली आहे.”

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !