Headlines

पोस्ट ऑफिसची नवीन जबरदस्त योजना, पैसे होतील दुप्पट, जाणून घ्या योजना !

पोस्ट ऑफिस नेहमी कमी गुंतवणुकीत जास्त फायदा ग्राहकांना करून देण्याचा प्रयत्न करत असते. अनेक नवनव्या योजनांच्या माध्यमातून ते ग्राहकांना गुंतवणुकीचे नवे मार्ग उपलब्ध करून देतात आणि सोबतच यातून नफा देखील चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतो. पोस्टाच्या लहान बचत योजनांवर सरकारद्वारे हमी मिळाली आहे. त्यामुळे अगदी विश्वासाने लोक या योजनांमध्ये आपले पैसे गुंतवतात. सरकारची छोटी बचत योजना असलेल्या किसान विकास पत्र (KVP)ची माहिती आपण आज जाणून घेऊयात. या योजनेचा लाभ आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही घेऊ शकता. या योजनेत १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

किसान विकास पत्र – किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसची एक लहान बचत योजना आहे. हे एक असं प्रमाणपत्र आहे जे कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. बाँ’ड प्रमाणेच ही कागदपत्र जारी केली जातात. यावर चांगलं व्याज मिळतं. तसेच या योजनेवरील व्याजाचे दर सरकार वेळोवेळी बदलत असते. ही योजनेअंतर्गत देशातल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडता येऊ शकते. योजनेवर ६.९ टक्क्यांप्रमाणे परतावा मिळतं आहे. तसेच, त्यात गुंतवणूक केल्यानंतर मॅ च्यु रि टी कालावधी हा १२४ महिन्यांचा आहे.

क र आणि गुंतवणूक सल्लागार जितेंद्र सोलंकी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ‘पोस्ट ऑफिस किसान विकास पत्रातील व्याज दर गुंतवणूकीच्या कालावधीत खात्यामध्ये उपलब्ध वार्षिक व्याज दरावर निश्चित केला जातो. उदाहरणार्थ, यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत एखाद्याने पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र खाते उघडल्यास त्याच्या गुंतवणूकीच्या कालावधीपर्यंत त्याला वार्षिक व्याज ७.६ टक्के मिळेल. एप्रिल ते जून २०२०च्या तिमाहीत नवीन दर लागू झाले आहेत, ज्यात आता नवीन खाती उघडली जात आहेत.

किती करावी लागेल गुंतवणूक – किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही उच्च मर्यादा नाही. परंतु आपल्या खात्यात १००० रुपये गुंतवलेले असावेत. १ हजार रुपयांपेक्षा जास्त कितीही गुंतवणूक आपण करू शकतो. सद्यस्थितीत किसान विकास पत्रात १ हजार, ५ हजार, १० हजार आणि ५० हजारांचं सर्टिफिकेट उपलब्ध आहे.

कोण गुंतवणूक करू शकतं – या किसान विकास पात्र योजनेमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती १८ वर्ष पूर्ण झालेली असावी. ज्वॉ इं ट अकाउंट देखील उघडता येते. विशेष म्हणजे अ ल्प व यी न मुलांसाठीही आपण हे विकास पत्र खरेदी करू शकतो. दोन व्यक्तींच्या नावेसुद्धा हे विकास पत्र खरेदी केलं जाऊ शकतं. हिं*दू अ*वि*भा*जि*त कुटुंबे (एच यू एफ) आणि अ नि वा सी भा र ती य या योजनेत भाग घेऊ शकत नाहीत. तथापि, योजना विश्वस्तांसाठी लागू आहे.

किती वेळेनंतर काढू शकता पैसे – एकदा गुंतवणूक केल्यानंतर कमीत कमी २.५ वर्षांची वाट आपण पाहू शकतो. परंतु दीर्घकाळासाठी पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळतो.

KVP च्या इतर सुविधा – ही योजना आ य क र का य दा 80 सी अंतर्गत येत नाही. तर जे काही रिटर्न्स येतील त्यावर टॅ’क्स आकारला जातो. या योजनेत टी डी एस कपात केली जात नाही. आपल्याला आपल्या गुंतवणूकीवर चक्रवाढ व्याज मिळेल. या सरकारी योजनेत आपल्याला नॉमिनेशनचीही सुविधा मिळते. एक व्यक्ती दुस-या व्यक्तीच्या नावे हे पत्र ह स्तां तरित करू शकतो. देशातील काही बँकांमध्ये हे ऑनलाइन पद्धतीनंही खरेदी करता येऊ शकते.

KVP योजनेमध्ये किती व्याज मिळते – सध्या किसान विकास पत्रात (के व्ही पी) गुंतवणूकीवर ६.९ टक्के व्याज मिळकत होती. पोस्ट ऑफिस डिपॉझिट योजनेत दर तीन महिन्यांनी व्याज दर निश्चित केले जातात. हे दर १ जुलै २०२० रोजी निश्चित केले होते. १ ऑक्टोबर २०२० रोजी पुन्हा एकदा व्याजदरामध्ये सुधारणा केली गेली आहे.

महत्त्वाची कागदपत्रे – पासपोर्ट साइज फोटो, KYC प्रक्रियेसाठी ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायविंग लायसेन्स), किसान विकास पत्राचे आवेदन पत्र, जन्माचा दाखला, निवास प्रमाणपत्र (विजेचं बिल, रेशन कार्ड, टेलिफोन बिल, बँक पासबुक)

खाते कसे उघडावे?
१. कोणत्याही पोस्टऑफिस मध्ये जाऊन आपण फॉर्म भरून खाते उघडू शकता. हा फॉर्म ऑनलाईन देखील डाउनलोड करून भरू शकतो. २. फॉर्मवर त्या व्यक्तीचे नाव, जन्मतारीख आणि त्या व्यक्तीचा पत्ता असणे आवश्यक असते.
३. फॉर्म वर किती किमतीचे किसान विकास पत्र आपण घेत आहेत याची रक्कम लिहिलेली असावी. ४. के व्ही पी फॉर्मची रक्कम चेक किंवा रोख रकमेद्वारे देता येते. जर आपण चेकद्वारे पैसे भरत असाल तर फॉर्मवर चेक नंबर लिहावा.

५. के व्ही पी एकल किंवा संयुक्त ‘ए’ किंवा संयुक्त ‘बी’ सदस्यता स्वरूपात कोणत्या आधारावर खरेदी केली जात आहे हे स्पष्ट करा. ६. संयुक्त खरेदीवर दोन्ही ला भा र्थ्यां ची नावे लिहा. ७. लाभार्थी अ ल्प व यी न असल्यास, जन्मतारीख (डी ओ बी), पालकांचे नाव लिहा. ८. फॉर्म सबमिट केल्यावर आपल्याला ला भा र्थी चे नाव, मुदतपूर्तीची तारीख आणि मॅ च्यु रि टी ची रक्कम यासह शेतकरी विकास प्रमाणपत्र मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !