८ वर्षानंतर आयपीएलशी निगडित शाहरुखने केला एका धक्कादायक खुलासा ! 

183

हिंदी चित्रपट सृष्टीचे बादशाह आणि किंग खान म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खानला अभिनयासोबतच क्रिकेटची देखील फार आवड आहे. हीच आवड म्हणून ते आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा मालक आहे. पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलचे हे पर्व रद्द झाले आहे. परंतु या आयपीएलशी निगडित एक किस्सा शाहरुख खानने सांगितला. २०१२ मध्ये जेव्हा कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलची विजेती ठरली तेव्हा किंग खान इतका खुश झाला होता की ते आपल्या छतावरून खाली उडी मारणार होते, पण ऐन वेळेला त्यांच्या मुलीने त्यांना सावरले. शाहरुखने सांगितले, कोलकाता नाईट रायडर्स जिंकली यावर ते विश्वासच ठेवू शकत नव्हते.
२०१२च्या आयपीएलमधील सुंदर क्षण आठवत शाहरुख म्हणाला, जेव्हा आम्ही पहिला सामना जिंकलो तेव्हा मी बाल्कनी मधून उडी मारणार होतो, तेव्हा सुहानाने मला मागून पकडलं. मला खरंच वाटतं नव्हतं की आमचा संघ सामना जिंकला आहे. त्या रात्री मी घरीच थांबलो होतो. मी एक खूप साधा खेळाडू राहिलो आहे. मी माझ्या संघाला कधी चक दे इंडिया चित्रपटात जसं भाषण दिल होतं तसं भाषण दिलं नाही.

हे वाचा – इरफान खान यांनी शेवटच्या मुलाखतीमध्ये बोललेली वाक्य वाचून तुम्ही पण भावुक व्हाल !२००७ साली प्रदर्शित झालेल्या चक दे! इंडिया या चित्रपटामध्ये शाहरुख खानने हॉकी खेळाचे कोच म्हणून पात्र साकारले होते. या चित्रपटामध्ये शाहरुखने संघाला प्रेरणादायी भाषण दिले होते. भारतीय महिला हॉकी संघाचे कोच म्हणून शाहरुखने ट्रेन करत तो संघ विश्वविजेता ठरला. आयपीएल मध्ये खूप सारे संग हे अनेकदा जिंकले आहेत, त्यामध्ये राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स हे संघ आहेत. सोबतच शाहरुख खानचा संघ कोलकाता नाइट राइडर्स देखील या यादीमध्ये सामील आहे.

हे वाचा – रामायणातील रामयांच्या मते हे बॉलिवुड कलाकार साकारू शकतात राम, सीतारावण !शाहरुखने हे देखील सांगितले की जेव्हा त्यांच्या संघ वारंवार हरत होता तेव्हा बऱ्याच जणांनी हा संघ दुसऱ्या कोणाला तरी विकावा असे सांगितले. पण शाहरुखने या गोष्टीला पूर्णतः विरोध केला. त्यानंतर २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाइट राईडर्स या संघाने आयपीएलचे जेतेपद जिंकले. झीरो या चित्रपटानंतर सध्या कोणत्याही नव्या चित्रपटामध्ये शाहरुख खान दिसले नाहीत. झीरो या चित्रपटात अनुष्का शर्मा, कैटरीना कैफ देखील होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवू शकला नाही.

हे वाचा – टिव्ही वरील छोट्या भूमिकांपासून सुरु झालेला इरफान खान यांचा प्रवास, अशी झाली होती पत्नी सोबत ओळख !शाहरुख देखील लॉकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात आहेत. शाहरुख खानने देखील कोरोना पीडितांच्या मदतीसाठी पीएम केयर रिलीफ फंडमध्ये पैसे दिले आहेत. त्याशिवाय किंग खानने रोटी बँकसाठी देखील मदत दिली आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या जनावरांची काळजी घ्या.

हे वाचा – स्वतःचा बालपणीचा जुना व्हिडिओ बघून इमोशनल झाला हा अभिनेता, जाणून घ्या कोण आहे तो ?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !