Headlines

पेप्सी कंपनीच्या या एका छोट्या चुकीमुळे कंपनीचे झाले करोडो रुपयांचे मोठे नुकसान !

पेप्सी हे भारतातील लोकप्रिय पेय आहे. अनेक थंडपेय जरी देखील सध्या बाजारात असली तरीही पेप्सी हे पेय तितकंच प्रमाणात ग्राहकांच्या पसंतीच आहे. पेप्सी हे पेप्सिको द्वारा निर्मित कार्बोनेटेड शीतपेय आहे. मूलतः १८९३ मध्ये कॅलेब ब्रॅडम यांनी तयार केले विकसित केले आणि ब्रॅड्स ड्रिंक म्हणून ओळखले ते गेले, १८९८ मध्ये त्याचे पेप्सी-कोला असे नामकरण करण्यात आले आणि नंतर १९६१ मध्ये पेप्सी असे नाव देण्यात आले.

कोणतंही उत्पादन बाजारपेठेत येताना, बाजारपेठेत आल्यानंतर आणि आपली जागा कायम ठेवण्यासाठी व सोबतच उत्पादनाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले जाते. हे मार्केटिंग करण्यासाठी एक मोहीम निश्चित केली जाते आणि या आखलेल्या मोहिमेच्या मदतीने लोकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग केली जाते. अशाच एका मार्केटिंग मोहिमेदरम्यान झालेल्या प्रिंटिंगच्या चुकीमुळे पेप्सीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आणि सोबतच त्यांच्या पेप्सी नावाच्या प्रतिष्ठेला देखील धक्का लागला.

१९९२ मधील फिलिपाईन्स मधील ही घटना आहे. पेप्सीने फिलिपाईन्समध्ये एक मार्केटिंग मोहीम राबवली होती. त्यावेळेस पेप्सीच्या बॉटल या काचेच्या होत्या. या बॉटलच्या झाकणच्या मागील बाजूस 349 हा कोड लिहला गेला होता. हा कोड ज्या २ लाख ग्राहकांना मिळेल, त्यांना पेप्सीकडून ३० लाख इतकी रक्कम देण्यात येईल. लाखो लोकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला. परंतु पेप्सीच्या एका प्रिंटिंगच्या चुकीमुळे म्हणजेच त्यांनी २ लाख झाकणऐवजी ८ लाख बॉटलच्या झाकणवर 349 हा कोड प्रिंट केला.

जेव्हा टीव्ही वर हा विजेता कोड दाखवला गेला, तेव्हा लाखो लोक पेप्सीकडून विजेत्या रक्कमेची मागणी करू लागले. पेप्सीने सर्वच विजेत्यांना रक्कम देण्यास नकार देताच फिलिपाईन्समध्ये मोठ्या प्रमाणात पेप्सीविरुद्ध आंदोलन सुरु झाली, पेप्सीचे ४० ट्रक जाळले गेले, इतकेच नव्हे तर पेप्सीमध्ये कामं करणारे कर्मचारी देश सोडून पळू लागले होते. वरील घटनेवर कोर्टात खटला उभा राहिला आणि तो सोडवला देखील गेला.

फिलिपाईन्स मधील या मार्केटिंग मोहिमेचा पेप्सीला प्रचंड तोटा झाला. प्रॉपर्टी, लीगल फी आणि ब्रँड इमेज या सगळ्याचा मिळून १५० करोड इतक्या नुकसानाला सामोरे जावे लागले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !