Headlines

लग्नानंतरही जर तुम्हाला एखादी बाई आवडत असेल आणि तुम्ही त्या बाईच्या प्रेमात पडला तर काय करावं ? जाणून घ्या !

लग्नानंतर एखाद्या व्यक्तीच बाहेर अफेयर असणं, ही सध्या साधारण गोष्ट आहे. याकारणाने अनेकदा सुरळीत सुरु असलेलं जीवन देखील विखुरतं. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण हे लग्नानंतर ही एखाद्या व्यक्तीला वाटू शकतं. आकर्षण वाटणं हि एक मानसिक गोष्ट आहे, फिलिंग आहे. आकर्षण कधी वेळ काळ बघून वाटतं नाही ते कधीही एखाद्या व्यक्तीबद्दल जाणवू शकतं आणि त्या व्यक्तीमध्ये गुंतत जातो.

हे त्या व्यक्तीसाठी, त्या कुटुंबासाठी फार त्रासदायक ठरतं, कारण यामुळे पती पत्नीच्या नात्यातल्या विश्वासाला तडा बसतो व पूर्ण कुटुंब या मानसिक त्रासाला सामोरं जातं. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटण्याचं अगदी कोणतंही कारण असू शकतं. तर अशाप्रकारचे आकर्षण एखाद्या व्यक्तीबद्दल वाटत असेल तर काय करावे, यासाठी हा आजचा लेख !

एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू लागल्यास प्रथम त्यामागील कारण शोधावे, ते कारण शोधून स्वतःवर ताबा मिळवणं हे पहिलं पाऊल. जर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण हे जोडीदार व तुमच्यामधील मतभेदांमुळे होत असेल तर ते मतभेद आधी मिटवा. मतभेदांमुळे कोणत्या इतर व्यक्तीकडे जाण्यापेक्षा आपलं जुनं नातं सांभाळलेलं कधीही उत्तम ! सोबतच आपल्या जुन्या नात्यासंबंधित आपल्या काही जबाबदाऱ्या देखील आहेत त्या ओळखा. आपल्याला थोड्या काळासाठी वाटणारं आकर्षण हे आपले संपूर्ण जीवन उलथापालथीचं ठरू शकतं.

स्वसंवाद ठेवत आपण काहीतरी चुकीचं करतो आहोत हे चुकीचं आहे, असे स्वतःला समजावत राहावे. काही वेळेस एखाद्या व्यक्तीबद्दल तेव्हा आकर्षण वाटते जेव्हा आपल्याला वाटतं की दुसऱ्या कोना व्यक्तीबरोबर रिलेशन ठेवण्यात काही गैर नाही. पण हे आकर्षण आपल्याला सुखद अनुभव देईल असा जर आपण विचार करत असाल तर ते अगदी चुकीचं आहे. आपली एक छोटी चूक आपले सुरळीत सुरु असलेलं आयुष्य उध्वस्त होऊ शकते आणि या गोष्टीचा वाईट परिणाम आपल्या मुलांवर देखील होऊ शकतो.

मुख्य गोष्ट म्हणजे आपल्याला एखाद्या व्यतींबद्दल जेव्हा आकर्षण वाटू लागतं तेव्हा त्या व्यक्तीशी जवळीक साधण्याचा आपण प्रयत्न करतो आणि जर का हि गोष्ट मर्यादा ओंडाळून गेली तर आपल्याला पुन्हा परतीची वाट मिळणं कठीण. दुसऱ्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आकर्षण वाटते, सुरुवातीला त्या व्यक्तीच्या फक्त चांगल्या गोष्टीच आपल्याला दिसतात. त्या व्यक्तीचे कोणतेही अयोग्य वागणे आपल्याला चुकीचे वाटत नाही. पण जेव्हा आपण सत्याला सामोरे जातो तेव्हा त्रासाव्यतिरिक्त काहीच मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करणे गरजेचे आहे.

आपण आपल्या एखाद्या चांगल्या मित्राची मदत घेऊ शकता, जो आपलं बोलणं सिक्रेट ठेवून आपल्याला यातून बाहेर येण्यासाठी मदत करू शकेल. असा एखादा मित्र नसल्यास काउंसलरशी चर्चा करून यावर तोडगा काढू शकता. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !