२००० ची नोट फाटलीय ? काळजी करू नका, येथे घ्या ती बदलून किंवा त्याचे मिळतील एवढे पैसे, जाणून घ्या कशी कुठे घेणार बदलून !

फाटलेल्या नोटांच्या बदल्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (नोट रिफंड) नियम २००९ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नियमांनुसार, लोक नोटाच्या फाटलेल्या स्थितीनुसार आरबीआय कार्यालये आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये फाटलेल्या किंवा सदोदित नोटा बदलू शकतात. आपल्याकडे फाटलेली नोट असल्यास काळजी करू नका. आज आम्ही सांगत आहोत की, आपण या फाटलेल्या नोट्स कोठून आणि कसे बदलू शकता. आणि त्या बदल्यात बँक आपल्याला किती पैसे देते.

नोट्स येथे बदला – आपण आपल्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोट्स बदलू शकता. परंतु ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध नाही. बँक कर्मचारी आपली नोट बदलण्यास नकार देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टपणे सर्व बँकांना नोटा बदलण्याची सूचना केली आहे. तसेच त्यांना त्यांच्या शाखांमध्ये या सुविधेचा बोर्ड लावावा लागेल.

फाटलेल्या 2000 च्या नोटे मधील किती रुपये तुम्हाला मिळतील ? आरबीआयच्या नियमांनुसार, नोट किती फाटली हे त्याच्या स्थितीवर अवलंबून असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटचे 88 वर्ग सेंटीमीटर (सें.मी.) असेल तर पूर्ण पैसे मिळतील, परंतु 44 वर्ग सेंटीमीटर असल्यास त्याचे अर्धेच पैसे मिळतील.

बँका कोणतीही फी घेत नाहीत – फाटलेल्या नोटांच्या देवाणघेवाणीसाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाही. ही सेवा बँकेमार्फत विनामूल्य पुरविली जाते. तथापि, अशा नोटा बदलून देण्यास बँक नाकारू शकते जर नोट खूपच खराब झालेली असेल किंवा जळालेली असेल तर. जर नोटा हेतुपूर्वक कापली गेली असावी अशी बॅंकेला शंका असेल तर ती देखील बदलली जाणार नाही.

परतावा किती असेल ? – फाटाके ५० रुपये, १०० रुपये आणि ५०० रुपये परत मिळवण्यासाठी आपली नोट दोन भागांमध्ये विभागली जाणे आवश्यक आहे, त्यातील एक भाग संपूर्ण नोटच्या ४० टक्के किंवा त्याहून अधिक भागांना व्यापेला गेला पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !