या कारणामुळे अखेर गूगलने Paytm अँप गूगल प्ले स्टोअर वरून हटवले, जाणून घ्या डिलीट कारण्यामागचे कारण !

381

सध्याच्या डिजिटल युगात पैशांची देवाणघेवाण सुद्धा डिजिटल रित्या केली जाते. यासाठी आता मोबाईल मध्ये अनेक ॲप उपलब्ध आहेत. एका क्लिकवर पैशांची देवाणघेवाण करणे यामुळे शक्य झाले आहे. मात्र यासाठीसुद्धा या ॲप्स ना नियम व अटी दिलेल्या असतात. शुक्रवारी पेटीएम या ॲपने नियमांचे उ ल्लं घ न केल्यामुळे गुगलने पेटीएमला गुगल प्ले स्टोअर मधून बाहेरचा रस्ता दाखवला.
पेटीएम द्वारे ऑनलाइन गे म खेळण्याची मुभा दिली होती. यामुळे या ॲप द्वारे खेळांमधून पै ज लावली जायची. जे गुगलने घालून दिलेल्या अटींच्या विरुद्ध होते. यापूर्वीही गुगल इंडियाने जु गा र धोरणाविरुद्ध नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या.
गुगल प्ले स्टोअर वर सध्या वेल्थ मॅनेजमेंट ॲप, पेटीएम मनी, मर्चंट ॲप, पेटीएम फॉर बिजनेस, मूवी टिकेटिंग एप्लीकेशन, पेटीएम इनसाईडर हे ॲप सुरू आहेत मात्र पेटीएमला पहिल्यांदाच गुगल प्ले स्टोअर वरून काढण्यात आले. जु गा र विरोधी धोरणाच्या काही नियम व अटी गुगलने आधीच आखून ठेवली आहेत त्यामुळे गुगल ऑनलाईन स ट्टा बा जी ला परवानगी देत नाही.
त्यामुळे कोणतेही गॅ ब लीं ग अॅप आम्ही ठेवू शकत नाही. जर एखाद्या अॅपने वेगळ्या वेबसाईट मार्फत पैसे जिंकून देणाऱ्या ऑनलाइन स्पर्धांची अनुमती दिली तर ते आमच्या धोरणांचे उल्लंघन करते त्यामुळे वापरकर्त्यांचे संभाव्य हानीपासून संरक्षण व्हावे यासाठी ही धोरणे आखण्याचे असे गुगलने सांगितले.
जर एखादे ॲप नियमांचे उ ल्लं घ न करत असेल तर आम्ही त्यांना या उ ल्लं घ नाबाबत सूचना देऊन ती चूक सुधारण्यास संधी देतो. मात्र तरीही वारंवार त्या चुका होत असतील तर आम्ही या प्रकरणाबाबत गांभीर्य दाखवून त्याविरोधात कारवाई करतो. त्यामुळे त्या ॲपचे गुगल वरील खाते बंद केले जाऊ शकते. आम्ही आखलेली धोरणे सर्व ॲप्सना समान लागू होतात व त्याची अंमलबजावणी होते असे गुगल इंडियाने सांगितले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !