Headlines

फक्त १ लाख रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा ४०००० पेक्षा जास्त नफा होईल, सरकार ८०% मदत करेल !

तुम्हाला जर बेकरी इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करायची इच्छा झाल्यास तुम्हाला त्यात मोदी सरकार मदत करेल. मुद्रा स्किमच्या अंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला १ लाख रुपयांची गुंतवणुक करावी लागेल. यासाठीच्या एकुण खर्चाच्या ८० टक्के फंडाची मदत सरकारकडुन मिळेल. त्यासाठी सरकारने स्वता प्रोजेक्ट रिपोर्ट मिळवला आहे. या बिझनेसकरिता सरकारने जी काही योजना आखली आहे त्यानुसार तुम्हाला सगळ्या खर्चानंतर दरमहा ४० हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो.

किती येईल खर्च – या प्रोजेक्ट करिता एकुण ५.३६ लाख रुपये खर्च येईल पण त्यातही तुम्हाला तुमचे केवळ १ लाख रुपयेच लावायचे आहेत. मुद्रा स्किमच्या अंतर्गत तुमचे जर सिलेक्शन झाले तर बॅंकेकडुन टर्म लोन म्हणून २.८७ लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन म्हणुन १.४९ लाख रुपये मिळतील. या व्यवसायासाठी तुमच्याकडे ५०० स्केअरफुट स्वताची जागा असणे आवश्यक आहे. जर ती नसल्यास भाड्याने घेऊन फाईल सोबत दाखवावी लागेल.

किती होईल फायदा – सरकारकडुन या व्यवसायासाठी जो आराखडा तयार केला आहे त्यानुसार ५.३६ लाख रुपयांमध्ये एकुण वार्षिक उत्पादन आणि विक्री चे अनुमान खालीप्रमाणे असेल. ४.२६ लाख रुपये- पुर्ण वर्षाभरासाठी कास्ट ऑफ प्रोडक्शन, २०.३८ लाख रुपये – संपुर्ण वर्षात तयार झालेले प्रोडक्ट विकुन २०.३८ लाख रुपये मिळतात. यातील बेकरी प्रोडक्टची विक्री किंमत बाजारात मिळणाऱ्या इतर प्रोडक्टशी तुलना करुन कमी केली जाईल.

६.१२ लाख रुपये- ग्रॉस ऑपरेटिंग प्रॉफिट , 70 हजार: एडमिनिस्ट्रेशन आणि सेल्सचा खर्च , 60 हजार: बॅंक लोनवरील व्याज, 60 हजार: अन्य खर्च , नेट प्रॉफिट: वार्षिक ४.२ लाख रुपये

मुद्रा स्किममध्ये करा अप्लाय – प्रधानमंत्री मुद्रा योजनेत सहभाग घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बॅंकेत अप्लाय करु शकता. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. ज्यात तुम्हाला नाव, पत्ता, बिझनेस अॅड्रेस, शिक्षण , सध्याचे वेतन आणि किती लोन हवे यासंदर्भातील माहिती भरावी लागेल. यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फि किंवा गॅरेंटी फी भरावी लागत नाही. तसेच लोन म्हणुन घेतलेली रक्कम ५ वर्षात परत देऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !