Headlines

वास्तुशास्त्रानुसार विवाहितेने या दिशेला तोंड करून झोपा, नवरा राहील सदैव खुश !

वास्तुशास्त्राचा इतिहास खुप जुना आहे. भारतात वास्तुशास्त्राला खुप फॉलो केले जाते. वास्तु म्हणजे केवळ घरातील वस्तु योग्य दिशेने ठेवणे नाही. वास्तुशास्त्रात या व्यतिरिक्तसुद्धा आणखी काही गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. जसे कि तुम्ही घरात झोपताना कोणत्या दिशेला झोपता हे सुद्धा खुप महत्वाचे आहे. चुकिच्या दिशेला झोपल्यास घरात मतभेद होऊ शकतात.

पती-पत्नीत मतभेद झाले कि घरातील इतर सदस्यांमध्ये सुद्धा भांडणे होतात. यामध्ये घरात येणाऱ्या नव्या सुनेची झोपण्याची दिशा खुप महत्वाची असते. जर तुम्ही तुमच्या झोपण्याच्या दिशेबाबत काळजी घेतलात तर तुम्हाला घरात येणाऱ्या अडचणींबाबत काळजी करण्याची गरज भासणार नाही. चला तर जाणुन घेऊ कोणत्या दिशेला झोपावे !

1. वैवाहिक महिलेने घरातील वायव्य दिशेला झोपु नये. कारण या दिशेला झोपल्यास त्या महिला घरापासुन वेगळे होऊन स्वत:चे वेगळे नवे घर बनवण्याचे स्वप्न पाहु लागतात. तर अविवाहित मुलींनी घराच्या वायव्य दिशेला झोपावे यामुळे त्यांचे लग्न लवकर होण्याच्या संधी वाढतात.

2.घरातील दक्षिण बाजु ही सर्वात शक्तीशाली असते. त्यामुळे घरातील मोठ्या आणि वृद्ध महिलांनी घरातील दक्षिण बाजुस झोपावे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपापसांत सलोख्याचे संबंध निर्माण होतात. त्यांचे घरातील सर्व व्यक्ती ऐकतात. याव्यतिरिक्त तब्येतीच्या दृष्टीनेसुद्धा ती जागा उत्तम आहे.

3. वैवाहीक जोडप्याने लग्नानंतर बेडरुममध्ये एकाच बेडवर झोपले पाहिजे. जर वैवाहिक जोडपे एकाच घरात वेगवेगळ्या बेडवर झोपत असेल तर त्यांच्यामध्ये दुरावा येवु शकतो. त्यामुळे डबलबेडवर एकच गादी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
4) वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर पत्नीने पतीच्या डाव्या बाजुस झोपावे. कारण पत्नीला पतीची डावी बाजु मानली जाते. तर पती हा पत्नीची उजवी बाजु असतो. अशाप्रकारे झोपल्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.

5) दक्षिण आणि पुर्व दिशेच्या मधल्या दिशेला आग्नेय असे म्हणतात. घरातील लहान महिलांनी किंवा घरातील नव्या सुनेने आग्नेय दिशाचा झोपु नये. यामुळे त्यांचे घरात दक्षिणेला झोपणाऱ्या वरिष्ठ महिलांसोबत त्यांचे चांगले जमते. तसेच सासु सुनेत भांडणे होत नाही. यामुळे त्या महिलेचा पतीसुद्धा खुष राहिल.

6) घरातील उत्तर आणि पश्चिम दिशेला कधीच अंधार करु नये . असे झाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर पडतो. या दिशेला अंधार ठेवल्यास तुमच्या सुखाला कोणाचीतरी नजर लागण्याची शक्यता असते. तर मंडळी तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास ती तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरु नका.

टीप – वास्तुशास्त्राविषयी पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.