” तू बुधवार पेठेतील रां** आहेस ” अशी कमेंट करणाऱ्या यूजरची मराठमोळ्या मानसी नाईकने चांगलीच जिरवली, दिले हे जबरदस्त उत्तर !

352

मराठी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध नृत्यंगना आणि अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. ति़चे वाट बघतोय रिक्षावाला हे गाणे खुप प्रसिद्ध झाले. मानसी तिचे सुंदर फोटो किंवा डान्सचे व्हिडीओ अनेकदी तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. त्यावर तिच्या चाहत्यांच्या अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया येत असतात. अशीच एक कमेंट एका युजरने नुकतीच केली. ती कमेंट थोडी निगेटीव्ह असल्यामुळे मानसीचे डोके चांगलेच सटकले. आणि राग अनावर झाल्यामुळे लाइव्ह सेशन घेऊन तिने त्या युजरला चांगलेच खडेबोल सुनावले.

टीव्हीवरील मालिका किंवा चित्रपटांच्या कथा प्रेक्षकांना आपल्याच आयुष्यातली गोष्ट आहे असे वाटत असते. त्यामुळे ती कथा सादर करणारे कलाकार सुद्धा त्यांना खुप जवळचे वाटु लागतात. पण जर त्या कलाकाराने प्रेक्षकांच्या मनाविरुद्ध जर काही काम केले तर मात्र त्याला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. काही वेळेस तर प्रेक्षक खुप खालची पातळी गाठत कलाकारांविरुद्ध कमेंट करत असतात. त्यामुळे काही वेळेस अशा कमेंटवर ते कलाकार त्यांचा राग व्यक्त करत असतात.

अशाच एका युजरने मानसी नाईकच्या एका फोटोवर बुधवार पेठेतील महिला अशी शिवीगाळ करत कमेंट केली कि ” तू बुधवार पेठेतील रां** आहेस ” या कमेंटवर मानसी नाईक चिडली आणि तिने त्या युजरला म्हटले कि तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिले ? आणि तुम्ही तिथे काय करत होता ? तेथील महिला त्यांच्या पोटापाण्यासाठी काम करत असतात, मोठ्या धाडसाने मेहनत करतात, घर चालवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असतात. त्यामुळे तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही सुद्धा ते काम करुन दाखवा. मानसीने काही दिवसांपुर्वी लाइव्ह आलेली त्यावेळी तिने बुधवार पेठेत काम करणाऱ्या महिलांसुद्धा आदराची गरज असल्याचे सांगितले.

मानसी नाईकचे हे उत्तर ऐकून सर्व सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि अशी कमेंट करणाऱ्या यूजर्सना हि एक चांगली चपराक बसलेय म्हणायला काही हरकत नाही आणि आम्हाला मानसी नाईकचा सार्थ अभिमान आहे.

काही दिवसांपुर्वी मानसीने बॉक्सर प्रदिप खरेरा सोबत थाटामाठात लग्न केले. तिच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीमधील तिचे जवळचे अनेक मित्रमैत्रीणी उपस्थित होते.

हद्द म्हणजे एका युजरने तर तुला लग्नासाठी मराठी मुलगा भेटला नाही का अशी खोचक कमेंटसुद्धा केली. अशा अनेक प्रकारच्या चित्रविचित्र कमेंटला कलाकारांना सामोरे जावे लागते. पण ते प्रत्येकालाच उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे ते अशा कमेंटस् ना इग्नोर करणे पसंत करतात.

Video Link -> https://www.instagram.com/p/CODh-U5hS12/?utm_source=ig_embed

काही दिवसांपुर्वी कलाकारांसुद्धा रिस्पेक्ट द्या असे म्हणत अभिनेता शशांक केतकरने त्याचा राग व्यक्त केला होता. शशांकला सुद्धा एका युजरने अत्यंत वाईट शब्दात प्रतिक्रिया दिली होती. त्यावर शंशाकने न राहुन त्या युजरला रिप्लाय देत म्हटले होते की, अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकारसुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो.

पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, या गोष्टीला लॉजिक नाही वगैरे कमेंट्स एकीकडे. आम्ही फक्त चेहरे असतो, आमच्यावर किमान 15 जण असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काहीतरी करुन बघायचं होत आणि रसिकांनाही वेगळं काहीतरी बघायचं होतं. त्यासाठीच तर ही मालिका आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !