Headlines

तुमची मुलं मागच्या जन्मी तुमची कोण होती, जाणून घेण्यासाठी वाचा ह्या रोचक गोष्टी !

जेव्हा आपल्या घरात मूल जन्माला येते तेव्हा त्यापाठी ते आपल्याकडून काहीतरी घ्यायला किंवा द्यायला येते अशी नियेजना असते. आपल्या कर्मानुसार आपल्या घरात मुलं जन्माला येतात. निसर्गाचा नियम आहे की, घरात एखादे मूल सुख देण्यासाठी जन्माला आले तर दुसरे दुःख देण्यासाठी आपल्या घरात जन्माला येते.

त्यातले एक मूल शत्रू बनते तर दुसरे मूल मित्र बनते. मागच्या जन्मीचे आपल्याला काहीच आठवत नाही, मग आपल्याला कसं कळतं की आपल्यासोबत असं का झालं असेल? पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जितके पेरता तितके जास्त पीक उगवते. अनेकदा या जन्मात काय पाप केले म्हणून असे मुलं जन्माला घातले त्यापेक्षा मुलं नसलेले बरे अशी लोकांची तक्रार असते.

काहीवेळेस आपल्या मागच्या जन्मातले पूर्वज मुलं म्हणून आपल्या घरी जन्म घेतात. मुलांचे चार प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ऋण बंधन. आधीच्या जन्मात ज्याच्याकडून आपण कर्ज घेतलेले असते किंवा कोणत्याही प्रकारे मागच्या जन्मात एखाद्याच्या संपत्तीची नासाडी केली असते. असा व्यक्ती आपल्या घरी जन्म घेतो. आणि जोपर्यंत त्याचा जन्मपूर्वीचा हिशोब पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आजार किंवा इतर कामांमार्फत तुमची संपत्ती नष्ट करतो.

दुसऱ्या प्रकारच्या मुलांमध्ये शत्रूचे मुलं जन्माला येते. तुमचा मागच्या जन्माचा शत्रू तुमच्यावर सूड घेण्यासाठी तुमच्या घरात जन्म घेतो. ते मुलं मोठे झाल्यावर आई-वडिलांशी भांडते, आयुष्यात इतरांना त्रास देते. नेहमी कठोर बोलून पालकांचा अपमान करणे. त्यांना दुःखी ठेवण्यात त्यांना आनंद येणे अशी या मुलांची लक्षणे असतात.

मुलांचा तिसरा प्रकार म्हणजे उदासीन मुल. अशी मुले आई-वडिलांची कधीच सेवा करत नाहीत तसेच त्यांना आनंदही देत ​​नाहीत. पालकांना स्वताच्या जबाबदारीवर मरायला सोडतात. लग्नानंतर तो आई-वडिलांपासून विभक्त होतो.

चौथ्या प्रकारचे मूल म्हणजे सोवक पुत्र. अशा प्रकारची मुलं. जर आपण मागच्या जन्मात कोणाची खूप सेवा केली असेल तर ती व्यक्ती आपल्या सेवेचे ऋण फेडण्यासाठी आणि आपली सेवा करण्यासाठी मुलगा किंवा मुलगी म्हणून तुमच्या घरी येते. तुम्ही जसे पेराल तसेच उगवेल. जर तुम्ही आई-वडिलांची सेवा केली तरच म्हातारपणी तुमची मुलं तुमची सेवा करतील, नाहीतर तुम्हाला प्यायला पाणीही कोणी देणार नाही.

म्हणूनच इतरांना त्रास होणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. जीवनात सद्गुणाचा हिशोब नेहमी जमा होतो. चुकून पाप झाले असेल तर पुण्यचा हिशेब इतका वाढेल की पापाचा हिशेब दाबला जाईल. नेहमी सत्कर्म करा, ज्याचे फळही चांगले मिळेल. लक्षात ठेवा की आपली कृती आपल्याला हसवते आणि आपली कृती आपल्याला रडवते. हे कर्माचे तत्व आहे, जे पेराल तेच फळ मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – वरील सर्व माहिती इंटरनेट वरच्या माहितीच्या आधारे बनवलेली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे याचे समर्थन करत नाही.