Headlines

परदेशातील भरमसाठ पगार सोडून आली भारतात, कठोर परिश्रमाच्या आधारावर बनली आयपीएस मग आयएएस अधिकारी !

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे विदेशात गलेगत पगार कमवतात परंतु देश सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न यामुळे त्यांच्यासाठी मोठा पगार देखील शूल्लक वाटतो. हे लोक मोठी नोकरी सोडून देश सेवा करण्यासाठी पुन्हा भारतात परततात, अशीच एक माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या महिलेच्या देशभक्तीमुळे व देश प्रेमी मुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आपल्या देश प्रेमामुळे व मेहनतीच्या आधारावर या महिलेने सुरुवातीला आयपीएस पद मिळवले आणि त्यानंतर आयएएस देखील बनली, चला तर मग जाणून घेऊया संघर्षाची अनोखी वेगळी कहाणी.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे ही काही सोपी गोष्ट नाही. यूपीएससी एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करता करता अनेकांचे आयुष्य पूर्णपणे निघून जाते परंतु असे म्हणतात ना की जर तुमचे कष्ट प्रामाणिक असेल आणि एखादे पद मिळवायची जर ध्येयप्राप्ती असेल तर तुम्ही सहजच एखाद्या पद मिळू शकतात. अशीच घटना एका महिलेच्या बाबतीत घडलेली आहे.

आज आपण ज्या महिलेबद्दल जाणून घेत आहोत त्या महिलेचे नाव आहे गरिमा अग्रवाल. गरिमा अग्रवाल यांनी देशसेवा व देश प्रेमासाठी आयपीएस आणि आयएएस बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. त्यांना विदेशामध्ये भरपूर पैशांची नोकरी देखील लागली होती. ती नोकरी सोडून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. गरिमा या 2019 च्या आयए एस बॅच च्या विद्यार्थिनी अधिकारी आहेत.

तुम्हा सर्वांना माहितीच आहे की, ही परीक्षा खूपच कठीण असते ही परीक्षा लवकर उत्तीर्ण होता येत नाही परंतु गरिमा यांनी अभ्यासाच्या जोरावर दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली. पहिला प्रयत्न त्यांनी आयपीएस पूर्ण केले व दुसऱ्या प्रयत्नात आयएएस पद मिळवले.

गरिमा लहानपणापासून अभ्यासात खूपच हुशार होत्या. त्यांना मॅट्रिक मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळाले होते. त्यानंतर गरिमा यांनी इंजीनियरिंग मध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगची डिग्री मिळवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी परदेशात गेल्या. तेथे गरिमा यांना चांगला पगार देणारी नोकरी देखील मिळाली होती. आज गरिमा यांची ओळख एक प्रामाणिक अधिकारी म्हणून केली जाते. आपल्या कामाबद्दल गरिमा खूपच प्रामाणिक आहेत. हाती घेतलेले काम मेहनतीच्या जोरावर पूर्ण करतात, अशी ओळख देखील त्यांची आहे.