Headlines

पोस्टाची जबरदस्त योजना, महिन्याला जमा करा १५०० रुपये आणि मुदतीनंतर मिळवा तब्बल ३१ लाख रुपये !!

सरकार द्वारे अनेकदा बचतीच्या वेगवेगळ्या योजना सुरु केल्या जातात. या योजनांचा प्रत्येक सर्वसामान्य नागरिक लाभ घेईल याचा विचार केलेला असतो. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणुक करताना प्राथमिक रक्कम भरण्यास कोणालाही त्रास होणार नाही याचा विचार केला जातो. सध्या पोस्टात सुद्धा एक अशी योजना आणली आहे ज्यात कमी गुंतवणुकीवर सुद्धा चांगले रिटर्न मिळवु शकतो. ज्याकाळी देशात इंटरनेट किंवा संदेश पोहचवण्यासाठी इमेलची सुविधा नव्हती त्यावेळेस पोस्टाद्वारेच संदेश एकमेकांना पाठवले जायचे. त्याकाळी पोस्ट ऑफिसमध्ये लोकांची झुंबड उडालेली असायची. पण आता काळ बदलेला आहे. पत्रांची जागा आता मोबाईलच्या मेसेजस् नी घेतली आहे. त्यामुळे पोस्टातील गर्दी सुद्धा आता हळु हळु कमी होऊ लागली आहे. पण पोस्टाकडुन नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालुच असतात ज्या ग्राहकांना पोस्टाकडे खेचत असतात.

तुम्ही पण जर सुरक्षित गुंतवणुकी सोबतच चांगले रिटर्न मिळवु इच्छिता तर पोस्टाच्या योजनेत गुंतवणुक करा.
पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजनेत कोणत्याही जोखीमेशिवाय चांगला फायदा मिळवता येईल. या योजनेत तुम्ही कमी पैशांची गुंतवणुक करुन ही जास्त पैसे परत मिळवु शकता. या योजनेत एकाचवेळी जास्तीतजास्त ३५ लाख रुपये मिळवु शकता. यासोबतच येथे लाइफ इंश्योरेंसचा ही लाभ मिळु शकता.

पोस्टाच्या ग्राम सुरक्षा स्किम मध्ये गुंतवणुक करणाऱ्या गुंतवणुकदाराचे वय १९ ते ५५ वर्षे असणे गरजे आहे. या योजनेत १० हजार पासुन ते १० लाखांपर्यंत गुंतवणुक केली जाऊ शकते. या योजनेचा प्रिमियम मासिक, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षिक पद्धतीने भरता येतो. तसेच हे पैसे भरण्यासाठी ३० दिवसांची सुट मिळु शकते.

जर तुम्ही आधीपासुनच या योजनेत गुंतवणुक केली आहे तर ४ वर्षांनी तुम्ही लोन सुद्धा घेऊ शकता. या योजनेनुसार जर तुम्ही वयाच्या १९ व्या वर्षी दहा लाख रुपयांची ग्राम सुरक्षा योजना खरेदी करता तर वयाच्या ५५ वर्षांपर्यंत तुम्हाला दर महिना १५१५ रुपये प्रिमियम भरावे लागेल. तसेच ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये तर ६० वर्षांसाठी १४११ रुपये मासिक जमा करावे लागतील. या योजने अंतर्गत गुंतवणुकदाराला प्रतिदिन ५० रुपये म्हणजेच महिन्याला १५०० रुपये जमा करणे गरजेचे आहे.

मिळकती बद्दल बोलायचे झाल्यास गुंतवणुकदाराला ५५ वर्षात ३१.६० लाख रुपये, ५८ वर्षात ३३.४९ लाख रुपये आणि ६० वर्षात ३४.६० लाख रुपये मिळतील. या योजनेअंतर्गत गुंतवणुकदाराला त्याची जमा रक्कम त्याचा वयाच्या ८० व्या वर्षी मिळेल. तसेच जर त्याआधीच गुंतवणुकदाराचा मृत्यू झाल्यास कायद्याने ते पैसे त्याच्या उत्तराधिकाऱ्यास मिळतील.
तसेच योजनेत सहभाग घेतल्यावर ३ वर्षांनी जर तुम्ही ती योजना सोडल्यास त्या व्यक्तीला कोणताही लाभ मिळणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !