Headlines

खायला एक वेळेची भाकरी नाही पण इन्कम टॅक्स वाल्यानी जेव्हा धाड टाकली तेव्हा मिळाली तब्बल एवढी संपत्तीची मालकीण !

ज्याची करोडोची संपत्ती आहे अशी व्यक्ती एका वेळच्या खाण्यासाठी वणवण करते हे शक्य आहे का. कोणालाही गोष्ट अशक्यच वाटते. पण राजस्थानमध्ये संजुदेवी सोबत हे खरेच असे घडत आहे. चला तर जाणुन घेऊ करोडोची मालकीण असुन देखील संजुदेवी कशी पैशांसाठी तरसते.

राजस्थानातील सीकर जिल्ह्यात असणारे दिपावास गांवतील रहिवासी संजु देवीच्या पतिचे निधन १२ वर्षांपुर्वीच झाले. पतिच्या निधनानंतर तिच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. अनेक अडचणींना सामोरे जाऊन ती तिच्या कुटुंबाचे पोट भरते. तिला दोन मुले देखील आहेत. स्वताचे व त्यांचे पोट भरण्यासाठी ती शेतात मजुरी व प्राण्यांचे पालन करते. अशातच आयकर विभागाच्या एका खुलाशाने तिची झोपच उडवली आहे.

जयपुर इनकम टेक्स विभागाला जयपुर-दिल्ली हाइवे दरम्यान असणाऱ्या दंड गावात एक जमीन मिळाली. या ६४ एकर जमीनीची किंमत १०० करोड रुपये आहे. कागदपत्रांच्या मते या जमीनीची मालकिन एक आदिवासी महिला आहे. म्हणजेच ती संजुदेवी आहे. पण तिला तिच्या या जमीनीबाबत काहीच कोणतीच माहिती नव्हती.

त्याचे झाले असे की दिल्ली-जयपुर हाइवेवर मोठे उद्योगपती गरीब आदिवासींच्या नावाने जमीनी खरेदी करतात. नियमांनुसार एका आदिवासीची जमीन दुसरा आदिवासी व्यक्तीच खरेदी करु शकतो. त्यामुळे मोठे उद्योगपती खोट्या नावांनी अशा प्रकारच्या जमीनी खरेदी करतात. जमीन खरेदी केल्यावर ते पावर ऑफ अटॉर्नी वर स्वताचे नाव लावतात. अशाच एका जमीनीची पडताळणी करण्यासाठी आयकर विभागाची टिम जेव्हा दीपावास गावात गेली तेव्हा समजले की ज्या संजूदेवी महिलेच्या नावावर ६४ एकर जमीन आहे ती एक साधारण मजुरी करणारी महिला आहे. तिला या जमीनीची काहीच माहिती नाही.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तिचे पती आणि सासरे मुंबईत काम करायचे तेव्हा त्यांनी जयपुरच्या आमेर येथे नेऊन तिचा कोणत्या तरी कागदपत्रांवर अंगठा घेतला होता. पण तिच्या नावार अशी १०० करोडची जमीन असल्याची तिला कोणतीच माहिती नाही. पतीच्या मृत्युनंतर ती अनेक अडचणींना सामोरे जात कुटुंबाचे पालन करत आहेत. पुढे तिने सांगितले कि पतीच्या मृत्युनंतर सुरुवातीला घरात किमान महिना ५ हजार रुपये तरी यायचे पण आता ते ही येणे बंद झाले आहेत.

आयकर विभागाला ही माहिती मिळताच जमीन कायदा अंतर्गत ही जमीन स्वताच्या ताब्यात घेतली. आयकर विभागाने जमीनीवर एक बॅनर लावला असुन त्यावर या जमीनीची मालकिण संजू देवी मीणा होती पण ती आता मालकिण नाही त्यामुळे आयकर विभाग ही जमीन ताब्यात घेत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !