Headlines

फक्त एका एकरात मिळवा २ ते ३ लाखाचं उत्पन्न ते ही फक्त ३ महिण्यात, जाणून घ्या या शेतीबद्दल !

सध्याच्या काळात शेतकरी पारंपारिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमधुन जास्त पैसे कमावत असतात. शिवाय आधुनिक शेती मधुन उगवलेल्या पिकाला मागणीसु्द्धा जास्त असते. त्यामुळेच शेतकरी नव्या आधुनिक शेतीकडे जास्त प्रमाणात वळलेले दिसतात. सध्या शेतकरी लेमनग्रासची शेती मोठ्याप्रमाणावर करत आहे. लेमनग्रासचे वैज्ञानिक नाव सिम्बेपोगोन फ्लक्सुओसस असे आहे. शेतकरी कमी पैशांत एका एकरात ही शेती करुन वर्षाला कमीत कमी दोन लाख रुपये कमावु शकतात.

लेमनग्रास मध्ये सिंट्रालचे प्रमाण ८० ते ९० टक्के असते. त्यामुळेच त्याला लिंबासारखा सुगंध येतो. शेतकऱ्यांच्या मते या शेती ला कोणतेही पक्षी खात नाही तसेच त्यावर कोणत्याही आपत्तीचा सुद्धा फरक पडत नाही. शिवाय त्याच्या लागवडीनंतर त्याचे एकदाच तण काढावे लागतात. वर्षातुन ४ ते ५ वेळा त्याचे सिंचन करावे लागते. त्यामुळे या शेतीला मेहनत कमी करावी लागते म्हणुनच सध्या शेतकरी या शेतीकडे जास्त प्रमाणात आकर्षिले जातात व त्याच्यातुन जास्त कमाई करतात.

लेमन ग्रास कशासाठी वापरतात – लेमन ग्रास च्या पानांपासून तेल तयार करतात या तेलाची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणावर आहे. या पानांची देठे सुद्धा औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात त्यामुळे औषध बनवणाऱ्या कंपन्या या झाडांची खरेदी करतात . सौंदर्यप्रसाधनं साठी आणि साबण तयार करण्यासाठी सुद्धा लेमनग्रास चा वापर केला जातो. या लेमन ग्रास मध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन ए असते तसेच त्यात सेंट्राल असल्यामुळे भारतीय लेमनग्रास पासून बनवलेल्या तेलाला जास्त मागणी असते. लेमन ग्रास या पाण्याचा वापर शेतात सुद्धा केला जातो. कोरोनाच्या काळात लेमन ग्रास पासून बनवलेल्या तेलाचा वापर सॅनिटायझर तयार करण्यासाठीसुद्धा केला होता.

या राज्यात लेमनग्रास ची शेती होते – भारतात केरळ ,तमिळनाडू, कर्नाटक ,आसाम ,पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश ,महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये शेतकरी लेमनग्रास शेती करतात. या शिवाय अन्य राज्यांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात याची शेती केली जाते. सध्या केंद्र सरकार सुद्धा शेतकऱ्यांना लेमनग्रास ची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत . याची शेती करण्यासाठी नाबार्ड मधून लोन सुद्धा मिळते. आयुष मंत्रालयाच्या किसान सशक्तीकरण योजनेत लेमन ग्रासला सहभागी केले आहे.

येथे करू शकतात शेती – तसे लेमन ग्रास कुठेही वाढू शकते परंतु चांगल्या उत्पादनासाठी उबदार आणि दमट हवामान असते जास्त उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे या झाडांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते . कमी पावसाच्या क्षेत्रात सुद्धा लेमनग्रास ची शेती केली जाऊ शकते.

लेमन ग्रास ची शेती कशी करतात – लेमन राष्ट्रीय शेतीसुद्धा भारताप्रमाणेच केली जाते .प्रथम नर्सरीमध्ये त्याच्या बिया रुजवल्या जातात. त्याची रोपे थोडी वाढल्यानंतर ती उपटून शेतात व इतरत्र लावली जातात. एका हेक्‍टरमध्ये चार किलो बियाणे लागू शकते. दोन महिन्यानंतर ही रोपे लागवडीसाठी योग्य तयार होतात. या झाडाचा वरचा भाग हा त्याच्या मुळापासून 15 सेंटिमीटर अंतरावर कापला जातो व त्याची मुळे त्यापासून वेगळी केली जातात. 30 ते 45 सेंटिमीटर अंतरावर झाडे लावली जातात. एका एकरात 12 ते 15 हजार रोपे लावली जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला या झाडाची लागवड केली जाते. सिंचनाची व्यवस्था असल्यास या झाडाची लावणी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा केली जाऊ शकते.

साधारणपणे एकदा या झाडाची लागवड केल्यानंतर पुढील पाच वर्षे पिके घेतली जातात. मात्र पीक पेरणीपूर्वी जमिनीतील योग्यप्रकारे मशागत करणे गरजेचे असते. एक एकर जमिनीत वर्षाला 150 ते 180 लिटर तेल मिळू शकते. याचे प्रमाण येत्या काही वर्षात आणखी वाढण्याची शक्यता आहे पहिल्या पेरणीनंतर 100 दिवसांनी हे पीक काढण्यासाठी तयार होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !