Headlines

फेसबुक, इंस्टाग्राम पैश्याने मालामाल करेल तुम्हाला, ह्या गोष्टीतून मिळवू शकता तुम्ही अफाट पैसे !

पैसा ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण ज्याला जमेल तर पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकजण इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत असतो.

आता तुम्ही या प्ल्रॅटफ़ॉर्मद्वारे सुद्धा कमाई करु शकता. फेसबुकच्या सीईओंनी त्यांच्या अधिकृत अकाउंटमधून एक पोस्ट शेअर केली आहे. 2024 पर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोणत्याही रेवेन्यू शेअरिंगवर पैसे आकारले जातील. ज्यात पेड ऑनलाइन इव्हेंट, सब्सक्रिप्शन, बॅज आणि बुलेटिनचा समावेश असेल.

तसेच क्रिएटर्ससाठी पैसे कमावण्याच्या नव्या संधीची घोषणा केली आहे. ज्यात डिजिटल क्लेक्टिबल्स, स्टार्स आणि इतरांमधील इंटरऑपरेबल सब्सक्रिप्शन फीचर्सचा समावेश आहे. फेसबुकच्या संस्थापकांनी 5 नव्या फिचर्सची घोषणा केली आहे.

1. Interoperable Subscriptions (इंटरऑपरेबल सब्सक्रिप्शन): या फिचरमुळे सबस्क्रिप्शन घेतलेल्या सबस्क्रायबरला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर ओनली फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी होता येईल.

2. फेसबुक स्टार्स: झुकेरबर्गने सांगितले की कंपनी स्टार्स नावाचे त्यांचे टिपिंग फिचर सुरु करत आहे. जेणेकरून अधिक लोक त्यांच्या रील, लाइव्ह किंवा व्हिडिओंमधून कमाई सुरू करू शकतील.

3. रील्सची कमाई करणे: याव्यतिरिक्त, कंपनी फेसबुक वर अधिक क्रिएटरसाठी रिल्स प्ले बोनस प्रोग्राम सुरु करत आहे, जे त्यांच्या इन्स्टाग्राम रील्स फेसबुकवर क्रॉस-पोस्ट करण्यास आणि तेथे त्यांची कमाई करण्यास अनुमती देईल.

4. क्रिएटर मार्केटप्लेस: मेटा सीईओ म्हणाले की कंपनीने इंस्टाग्रामवर सेट प्लेसची टेस्टींग सुरू केली आहे जिथे क्रिएटरसंना शोधले जाऊ शकते आणि पैसे दिले जाऊ शकतात.

5. Digital Collectibles (डिजिटल कलेक्टिबल्स): इन्स्टाग्रामवर एनएफटी दाखवण्यासाठी आणि अधिकाधिक मेकर्सच्या सपोर्टरचा विस्तार करत आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले होते की, आम्ही लवकरच हे फिचर फेसबुकवरही घेऊन येऊ. युएस क्रिएटर्सच्या एका छोट्या ग्रुपपासून याची सुरुवात होईल. जेणेकरुन लोकांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर याची क्रॉस पोस्ट करात येईल. आम्ही इन्स्टाग्राम स्टोरीवर स्पारकर सोबत एनएफटीची टेस्टींग करणार आहोत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !