Headlines

आपल्याकडे पैसे छापण्याची मशीन आहे मग पैसे छापून आपण गरिबी का मिटवू शकत नाही, जाणून घ्या !

देशात अनेक ठिकाणी गरीबी पाहायला मिळते .. तरी आपल्या देशाकडे स्वताची पैसे छापण्याची मशिन आहे. त्यामुळे स्वताची मशिन असुन देखील सरकार त्यात भरपुर पैशांची छपाई का करत नाही, सरकारच्या हातात असुन देखील गरीबांना श्रीमंत बनवण्यासाठी सरकार मदत का करत नाही असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जर सरकारने जास्तीचे पैसे छापण्यास सुरुवात केली तर बेरोजगारांना घर सावरण्यासाठी पैसे मिळतील.

तसेच अनेकांचे आर्थिक प्रश्न सुटतील. पैशांच्या अडचणींमुळे जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांचे नाहक जीव जाणार नाहीत. अशा अनेक शंका कुशंका तुमच्या मनात आल्या असतील तर हा लेख खास तुमच्या साठी .. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सरकार जास्त पैसे का छापत नाही याचे उत्तर देणार आहोत.

पैसे छापण्यासाठी पण काही नियम असतात. म्हणजेच सरकार केवळ तेवढेच पैसे छापु शकतात जेवढे त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत. जर रिसोर्सेस कमी असतील तर ते जास्त पैसे छापु शकत नाही. हा पण मंदीच्या काळात जेव्हा खूप गंभीर परिस्थिती उद्भवते तेव्हा देश अधिकच्या नोटांची छपाई करु शकतो. परंतु असे करणे भविष्यात देशालाच महागात पडते कारण क्षमतेपेक्षा अधिक पैसे छापल्यास देशाला तीव्र महागाईचा सामना करावा लागतो.

खरेतर जेव्हा तुमचा उत्पन्न वाढतं, तेव्हाच तुमचा खर्च देखील वाढतो, आणि तुमच्या राहणीमानानुसार गरजा देखील वाढतात. उदाहरण द्यायचे झाल्यास.. सरकारने सर्व देशवासीयांच्या खात्यात १ करोड रुपये जमा केले तर प्रत्येकजण त्यांच्या मनासारख्या व गरजेच्या वस्तु विकत घेण्यास उतावीळ होईल. सर्वसामान्य माणसाची प्राथमिक गरज ही घर असते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पहिला घर घेण्याचा विचार येईल.

एखाद्या घराची किंमत २५ लाख होती तेव्हा पैशांच्या अभावी ते घर खरेदी झाले नाही. पण प्रत्येकाच्या खात्यात १ कोटी जमा झाल्यापासुन अनेक लोक बिल्डरकडे ते घर खरेदी करण्यासाठी धाव घेतील. अचानक एकाचवेळी आलेले खरेदीदार पाहुन बिल्डर त्या घराची किंमत वाढवतो. या उदाहरणावरुन तुम्ही बाजारातील इतर वस्तुंच्या भाववाढीचा अंदाज बांधु शकता.

पैसे असल्यामुळे लोकांना श्रीमंत झाल्यासारखे वाटते पण जेव्हा पैसा नसतो तेव्हा ज्या वस्तुची किंमत १०० रुपये होती तीच वस्तु पुढे ५०० रुपयांची होते. महागाईमुळे लोकांचा पैसा लवकर संपतो तसेच लोकांत हालाखीची गरीबी निर्माण होते.
अनेक देशांना चलन वाढीचा फटका देखील सहन करावा लागला आहे.

झिम्बाब्वे या दक्षिण आफ्रिकेतील देशाच्या सरकारने एकदा खूप नोटा छापण्याची चूक केली. त्यामुळे तेथील चलन मुल्यात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली परिणामी परिस्थिती अशी बनली की लोकांना दूध, ब्रेड यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी नोटांनी भरलेल्या पिशव्या घेऊन जावे लागले. पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीनेदेखील ही चूक केली होती.

युद्धाच्या वेळी परकीय चलन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चलन छापले. पण याचा उलटा परिणाम जर्मनीला भोगायला लागला. चलन वाढीमुळे जर्मनीची अर्थव्यवस्था विस्कळीत होण्यास लागली. व्हेनेझुएलामध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीसुद्धा लाखो रुपये खर्च करावे लागत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !