दिवसाला फक्त ५० रुपयाची बचत करा आणि ३५ लाख रुपयांचे मालक बना, जाणून घ्या कसे !

220

जर तुमच्याकडे कोणतेही काम नसेल आणि तुम्हाला पैसे कमावण्याची तीव्र इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा लेख नक्कीच महत्वाचा आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडुन सर्वसामान्य लोकांसाठी फायदेशीर अशी एक स्किम चालवली जाते आहे. त्यात तुम्ही घर बसल्या पैसे कमावु शकता.

पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजनेद्वारे तुम्ही पैशांची गुंतवणुक करु शकता. यात तुम्ही कमी पैशांत सुद्धा गुंतवणुक करु शकता. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेमध्ये कमी गुंतवणुकीत कोणतीही जोखीम न घेता चांगले पैसे कमावता येतात. या योजनेत तुम्ही छोटी रक्कम गुंतवून मोठी रक्कम जमा करू शकता. जर तुम्ही दररोज 50 रुपये गुंतवले तर तुम्हाला 35 लाख रुपये सहज मिळतील. तसेच सोबतच जीवन विम्यामध्ये नफा देखील मिळेल.

ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणुक करण्यासाठी तुमचे वय १९ ते ५५ असणे गरजेचे आहे. यात तुम्ही १०००० ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करु शकता. याचे प्रिमियम तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने भरु शकता. तसेच ते पैसे भरण्यासाठी तुम्हाला ३० दिवसांची सुट मिळेल. ही पॉलिसी घेतल्यावर ४ वर्षांनी तुम्हाला त्यावर लोन सुद्धा मिळु शकते.

तुम्ही वयाच्या १९ व्या वर्षी जर १० लाख रुपयांची ग्राम सुरक्षा योजना खरेदी करता तर वयाच्या ५५ वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहिना १५१५ रुपये प्रिमियम भरावे लागेल. यात ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १४११ रुपये महिन्याला जमा करावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्हाला दर दिवसाला ५० म्हणजेच महिन्याला १५०० रुपये जमा करावे लागतील. गुंतवणुकदारास ५५ वर्षांसाठी ३१.६० लाख रुपये, ५८ वर्षांसाठी ३३.४० रुपये आणि ६० वर्षांसाठी ३४.६० लाख रुपयांचा मॅच्युरिटीचा फायदा मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !