Headlines

नीता अंबानी आहेत जगातील श्रीमंतांच्या यादीत पण त्यांची बहीण करते हा जॉब, जाणून घ्या !

भारतातील प्रथम क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांना ओळखलं जातं. रिलायन्स ग्रुपचे ते सर्वेसर्वा आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुख्यतः रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि तेल व वायू क्षेत्रातील व्यवहार करते. रिलायन्स रीटेल लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी नीता अंबानी देखील तितक्याच लोकप्रिय आहेत; त्या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक आहेत. २०१६ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्यपद मिळाले, हे सदस्यत्व मिळवणाऱ्या नीता अंबानी या पहिल्या भारतीय महिला आहेत.

नीता अंबानींची लाईफस्टाईल त्यांचं सौंदर्य या सर्व विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. भारतामध्ये त्यांचा चाहता वर्ग देखील आहे. नीता अंबानी यांच्याबद्दल आपण बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर काही ना काही वाचत असतोच आणि त्यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे, परंतु आपल्याला माहित आहे का, त्यांची एक बहीण देखील आहे जी थंडीया अधिक प्रमाणात त्यांच्यासारखीच दिसते. खरंतर नीता अंबानी यांचा परिवार मीडियापासून फार दूर राहिला आहे. परंतु ज्या ज्या वेळेस अंबानी परिवारामध्ये कोणताही समारंभ असेल तर नीता अंबानी यांची बहीण तिथे उपस्थिती नक्की दर्शवते. त्यांच्या बहिणीचं नाव आहे, ममता दलाल. ममता दलाल नीता अंबानी यांची सख्खी बहीण आहे व त्नीती ता यांच्यापेक्षा चार वर्षाने लहान आहेत.

एकीकडे नीता अतिशय चैनीची विलासी जीवन जगत असते, तर दुसरीकडे तिची बहीण ममता अतिशय सामान्य जीवन जगत असते. प्रसिद्धीपासून दूर असल्यामुळे नीताची बहीण ममताबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. नीता अंबानी आज एक प्रसिद्ध बिझनेस टाइकून बनल्या आहेत तर त्यांची बहीण ममता शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. ती शिक्षिका म्हणून काम करते. सर्वांनीच मुकेश अंबानींच्या धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बद्दल ऐकले असेल. ही भारतातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. नीता अंबानी या शाळेच्या संस्थापिका आहेत. त्याची लहान बहीण ममता या शाळेत प्राथमिक वर्गाला शिकवणारी शिक्षिका आहे. यासोबतच ती शाळेचे व्यवस्थापनही सांभाळते.

ममता दलाल यांच्याप्रमाणे, तिची मोठी बहीण नीता अंबानी देखील पूर्वी शिक्षिकाच होती. लग्नानंतर काही काळ ती मुलांना शिकवत असे. पण नंतर ती पती मुकेश अंबानींच्या व्यवसायामध्ये व्यस्त झाली. बॉलिवूड इंडस्ट्रीतील ९०% मुले धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. अशा परिस्थितीत ममतांनी शाहरुख खानची मुलगी सुहाना खानपासून सचिन तेंडुलकरची मुले सारा आणि अर्जुन तेंडुलकर यांना शिकवले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

ममता दलाल यांना माध्यमांची चमक फारशी आवडत नाही. तिला साधे जीवन जगायला आवडते. तिची जीवनशैली पाहून ती जगातील सर्वात श्रीमंत महिलेची बहीण आहे, असे म्हणणे कठीणच आहे. ममता आणि नीता यांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे. प्रत्येक सुख -दु:खात ह्या दोघी एकमेकांच्या पाठीशी उभ्या असतात. ममता दलाल अंबानी कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावतात. ममता तिची भाची ईशा अंबानीच्या लग्नात नीता अंबानीसोबत डान्स करताना दिसली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ममता दलाल यांनी बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी मॉडेलिंग देखील केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !