Headlines

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील कलाकारांना एका एपिसोड साठी मिळते तब्बल एवढे मानधन !

टेलिव्हीजन विश्वात टीआरपीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक चॅनल त्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमध्ये रंजक वळणे आणत असतात. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास टिआरपीच्या स्पर्धेत झी मराठी वाहिनी सपशेल ढासळली होती. एक काळ होता जेव्हा संध्याकाळचे सात वाजले की घराघरात झी चे चॅनल लागायचे ते रात्री झोपेपर्यंत सुरु असायचे.

पण गेल्या काही दिवसांत रटाळ कथांमुळे प्रेक्षकांनी झी कडे पाठ फिरवली होती. त्यामुळे प्रेक्षकांना परत आणण्यासाठी झी ने त्यांचा चेहरा मोहरा बदलला. तसेच प्रेक्षकांसाठी तब्बल ५ नव्या मालिका एकाच महिन्यात लॉंच केल्या. या नव्या बदलाचा झी मराठीला फायदासुद्धा झाला.

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका टीआरपी स्पर्धेत अव्वल ठरली आहे. ही मालिका सुरु होण्यापुर्वीच तिचा प्रोमो लक्ष वेधुन घेत होता. या मालिकेतल्या चिमुकल्या परीने सर्वांना तिच्या प्रेमात पाडले आहे. एवढ्या लहान वयात ही चिमुकली श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बहेरे यांसारख्या तगड्या स्टार सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आता तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असणार कि या परीचे मानधन किती असणार… तर आम्ही आज तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत दिसणाऱ्या परीचे खरे नाव मायरा वैकुल असे आहे. ती केवळ ५ वर्षांची आहे. पण वयाच्या ५ व्या वर्षीसुद्धा ती बड्या स्टारस् ना टक्कर देत आहे. प्रेक्षक तिच्यामुळे मालिकेकडे ओढले जात आहेत. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी प्रार्थना बेहरे ३२,००० रुपये, श्रेयस तळपदे ३८,००० रुपये, संकर्षण कऱ्हाडे २८,००० रुपये घेतो. तर अवघ्या पाच वर्षांची चिमुकली मायरा तब्बल १०,००० हजार रुपये घेते. इतर कलाकारांपेक्षा तिचं मानधन कमी असलं तरी तिचं वय आणि तिच्यासमोर असलेल्या कलाकारांच्या मानधनाच्या मानाने तिचं हे मानधन खूप आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !