Headlines

वा रे पट्ठ्या साधी सायकल बनवली इलेक्ट्रिक, चिखलात बुडवा नाहीतर आग लावा, सायकलला काहीच होत नाही, बघा कशी बनवलीय !

सध्या परदेशी बनावटीच्या वस्तु चांगल्या असा समज बऱ्याच लोकांचा तथा मोठमोठ्या उद्योगपतींचा होतो. त्यामुळे त्या खरेदी करुन त्या आपल्या देशात विकण्याचा अधिक कल असतो. मात्र त्यामुळे कुठेतरी देशातले टेलेंट अलुप्त होत चालले आहे. मात्र आनंद महिंद्रा या सर्व गोष्टींना नेहमीच अपवाद असतात. देशातील मोठमोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले आनंद महिंद्रा सोशल मीडिया माध्यमावर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. खेड्य़ाकपाऱ्यात राहणाऱ्या टेलेंटेड लोकांचे अनोखे टेलेंट ते नेहमीच इतरांपुर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असतात व त्यांचे कौतुक देखील करतात.

असेच काहीसे गुरसौरंभ सिंग सोबत घडले. काही दिवसांपुर्वी आनंद महिंद्रा यांनी देशातील शेवटच्या दुकानात चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी एक सायकलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यास त्यांनी देशी जुगाड असे म्हटले आहे.
गुरसौरंभ सिंग याने इलेक्ट्रिक सायकल स्वता तयार केली. आनंद महिंद्रा यांना त्याचा जुगाड आवडला असुन त्यात नुकसान झाले तरी चालेल पण त्यात पैसे गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या युवकाला आनंद महिंद्रा मदत करणार आहेत.

ध्रुव विद्युतचे फाउंडर गुरसौरभ यांनी हिरोच्या अॅटलास सायकल वर प्रयोग करत तिला इलेक्ट्रिक बनवले. त्यांनी असे डिव्हाईस तयार केले आहे ते पायंडलच्या मधल्या त्रिकोणी जागेत बसविले आणि हँडलवरचे बटन आणि अॅक्सिलेटर दाबला की मागचे चाक पळतच सुटते . यासाठी त्या सायकलमध्ये कोणताही बदल तसेच वेल्डिंग करावे लागत नाही, या सायकलचा वेग ताशी २५ किमी आहे. कोणत्याही प्रकारच्या रस्त्यात हे डिव्हाइस उत्तम काम करते.

या डिव्हाईसची रेंज ४० किमी आहे. या सायकलवर चिखलात बुडवुन देखील प्रयोग करुन पाहिला , तरीही बटन दाबताच चालू झाली . त्या डिव्हाईसला आगही लावली तरीबी सायकल चालू होते. ती आग विझविण्यासाठी त्याने पाणी टाकले , तरीबी चालूच राहते. त्यामुळे या सायकल पाठी त्याने बरीच मेहनत घेतल्याचे दिसुन येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !