Headlines

ट्रॅफिकचे नियम बदलले, पोलिसांच्या वर्दीवर लावले जाणार कॅमेरे, जाणून घ्या असे असतील नवे नवीन नियम !

भारत सरकारने पुन्हा एकदा चालनासंबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. तयार केलेल्या नव्या नियमांनुसार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्याचे चालन कापल्यानंतर १५ दिवसांनी नोटीस मिळेल. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि राजमार्ग मंत्रालयाने ट्रॅफिक संबंधित नियमांची नियमावली जारी केली आहे. जोपर्यंत प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत पुराव्यांचा रेकॉर्ड ठेवला जाईल. तसेच ट्रॅफिक पोलिसांना नियम तोडणाऱ्यांचे व्हिडीओसुद्धा बनवावे लागतील. आता केवळ फोटो घेऊन चालणार नाहीत.

नव्या वाहतुकींच्या नियमांनुसार ट्रॅफिक संबंधित नियमांचे पालन करण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरा, मोटारीच्या डॅश बॉर्डवर लावला जाणारा कॅमेरा, वेग वाढवणारा कॅमेरा, स्पीड गन, ऑटोमेटीक नंबर प्लेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला जाईल. याव्यतिरिक्त चालान जारी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंफोर्समेंट डिवाइसचा वापर केला जाईल. तसेच ट्रॅफिक पोलिसांच्या वर्दीवर कॅमेरे लावले जातील. याच कॅमेऱ्यांद्वारे केलेल्या रेकॉर्डींगवरुन तक्रारींचे निवारण केले जाईल.

बिहार, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्ली सोबतच देशाच्या १३२ शहरांच्या रस्त्यांवर आणि हायवे जंक्शनवर डिजिटल उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. नव्या नियमावलीनुसार ४ वर्षांच्या बालकाससुद्धा एक प्रवासी मानले जाईल. म्हणजेच नव्या नियमांनुसार स्कुटर, अॅक्टीव्हा, मोटारसायकल वर ४ किंवा ४ पेक्षा जास्त वय असलेले मुल सुद्धा गाडीवर बसले असेल तर त्यास तिसरी सवारी मानले जाईल.

नवीन मोटारवाहन अधिनियम कलम १९४ अ नुसार जर एखाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला १००० रुपयांचा दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त जर तुम्ही कारमध्ये मद्य प्यायलेले असताना पकडले गेलात तर दंड रुपये १०००० रुपये आणि ६ महिन्यांच्या कारावसाची शिक्षा होऊ शकते. तर पुन्हा तिच चुक केल्यास २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि १५००० रुपयांचा दंड भरावा लागेल.

नव्या ट्रॅफिकच्या नियमांनुसार रहदारीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीची रेकॉर्डींग अनिवार्य आहे. तसेच चुकीच्या ठिकाणी केलेली पार्किंग, ओव्हरस्पिड, रेड लाईट जंप केल्यावर, गाडी चालवताना मोबाईलचा वापर केल्यास, सीट बेल्ट घातला नसेल तरीही रेकॉर्डिंग करावी लागेल. नंबर प्लेटवर जर काही गडबड असल्यास तर रेकॉर्डींग अंतर्गत कार्यवाही केली जाईल.आता केवळ फोटोवरुन कोणतेही काम होणार नाही.

पुर्वीचे नियम – जुन्या नियमांनुसार रहदारीचे नियम तोडणाऱ्यास चालनाची नोटीस जाईपर्यंत खुप वेळ लागायचा. त्यामुळे दंडाची रक्कम जमा करण्यास खुप कालावधी जायचा शिवाय सरकारला रेवेन्यु वेळेत मिळायचा नाही. त्यामुळेच ट्रॅफिकसंबंधित नियम काही अंशी बदलण्यात आले. नवी दिल्लीतील एका सिनीयर ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले की, नव्या नियमांतर्गत दिल्लीत अनेक ठिकाणी रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरा आणि साईन बॉर्ड लावण्यात आला आहे. शिवाय काही वाहन चालक पोलिसांसोबत गैरवर्तन करतात ते सुद्धा या नव्या नियमांत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमुळे रेकॉर्ड केले जाईल. त्यामुळे त्याच्यावर कार्यवाही करण्यास मदत मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !