Headlines

सिगारेट ला हिंदी मध्ये काय म्हणतात? IAS पदाच्या मुलाखतीत असे विचारले प्रश्न वाचून तुम्हीही चक्रावून जाल !

MPSC, IPS, IAS, UPSC अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या अनेक जण देतात. सर्वच परीक्षा या कठीण असतात. परंतु आयएएसची परीक्षा सर्वात जास्त कठीण मानली जाते. परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने जर लेखी परीक्षा पास केली तर त्याला मुलाखतीसाठी बोलावले जाते.

या मुलाखतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर तो आहे तुमचा “आत्मविश्वास”. या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न हे तसं पाहायला गेलं तर अनेक परीक्षांमध्ये विचारले जातात. परंतु आयएएस पदाची मुलाखत हा प्रतिष्ठित सिव्हिल परीक्षेचा शेवटचा टप्पा आहे, हा टप्पा पूर्ण करणं फार महत्त्वाचं असतं. बहुतेक उमेदवार हे या टप्प्यावर येऊन हार पत्करतात.

आयएएस पदाच्या मुलाखतीत अगदी संभ्रमात टाकणारे प्रश्न असतात, ज्यांचं उत्तर ही आपल्याला माहीत असतं पण इतके गोंधळून जातो की आपण विचारच करत राहतो. या टप्पयावर येऊन जर का थोडी जरी चूक झाली तरी उमेदवार सरळ बाद केला जातो. आज पाहूया आयएएस पदाच्या मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे.

1.प्रश्न : जगात असा कोणता प्राणी आहे ज्याला 3 डोळे आहेत?
उत्तर : तुआटरा. तुआटरा हा एक असा प्राणी आहे ज्याला ३ डोळे असतात आणि हा प्राणी फक्त न्यूझीलंडमध्ये पाहिला जातो.

2. प्रश्न : राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत कोण आपल्या पदावर कायम राहू शकतं?
उत्तर : “राज्यपाल” हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

3. प्रश्न : लोखंड कसे तयार केले जाते?
उत्तर : धातूपासून लोखंड बनवलं जातं. हे जमिनीमधून खनिजाच्या रूपात काढलं जातं. जमिनीमधून मिळणारं हे चौथ्या क्रमांकाचं सर्वात जास्त मिळणारं खनिज आहे.

4. प्रश्न : तुमच्या खिशात ५ चॉकलेट आहेत, दोन आपण काढली तर आपल्याकडे किती चॉकलेट आहेत?
उत्तर : हा प्रश्न ऐकला की बरेच जण विचारात पडतात. पण आपण जर या प्रश्नाकडे अगदी काळजीपूर्वक समजून घेत तर, या प्रश्नाचं नेमक उत्तर आपल्याला मिळेल. याच उत्तर ५ असं आहे कारण आपल्याकडे खिशात ५ चॉकलेट आहेत आणि आपण जरी दोन काढून घेतली तरी आपल्याकडे ५ चॉकलेट उरणार.

5. प्रश्न : एक महिलेचा १९३५ मध्ये जन्म झाला आणि १९३५ मध्येच तिचा मृत्यू झाला मग तीच वय ७० वर्ष कसं?
उत्तर : हा प्रश्न वाचल्यानंतर बरेच जण या विचारात पडले असतील, असं कसं होईल एखादी स्त्री १९३५ मध्ये जन्माला आणि १९३५ मध्ये मृत्यू पावली आणि त्यात तिचं वय ७० वर्ष कस असू शकेल? या प्रश्नाचं खरं उत्तर आहे, की १९३५ ही संख्या आहे तो एका खोलीचा क्रमांक आहे. हा प्रश्न फार फिरवून विचारला गेला आहे.

6. प्रश्न : सिगरेट ला हिंदी मध्ये काय बोलतात?
उत्तर : सिगरेटला हिंदीमध्ये धूम्रपान दंडीका असं म्हणतात.

7.प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी ला पण दिवसा प्रकाशामध्ये पाहू शकत नाही?
उत्तर : अंधाराला पण दिवसाच्या प्रकाशामध्ये पाहू शकत नाही.

8. प्रश्न : जसे की गायीचे वासरू असते तसे बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात?
उत्तर : या प्रश्नाचं उत्तर आहे कोकरू.

प्रश्न : जपान मधील लोक केळं खाल्ल्यानंतर त्या केळ्याच्या सालीचे काय करतात?
उत्तर : या प्रश्न उत्तर साधं सरळ आहे, ती साल फेकून देतात.

प्रश्न : असा एखादा पदार्थ सांगा जो पाण्यात टाकल्यानंतर थंड न होता गरम होतो.
उत्तर : बिन भाजलेला चुना हे या प्रश्नाचं उत्तर आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !