पेट्रोल दर वाढीमुळे वैतागला आहात ? या आहेत इलेक्ट्रिक गाड्या ज्या एका चार्जिंग मध्ये जातात १८० किलोमीटर !

505

सध्या संपुर्ण देशात इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. देशांतील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी पाक केली आहे. ही इंधनवाढ खिशाला परवडणारी नसल्यामुळे लोकांनी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक वाहनांकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. या इलेक्ट्रीक वाहनांमुळे पर्यावरणाला हानी पोहचत नाही. बॅटरीवर चालणारी ही वाहने इंधनांवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा प्रदषुण पसरवत नाही. त्यामुळे लोकांनी नवी पसंती पाहता देशातील वाहन कंपन्यांमध्ये सध्या इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करण्यावरुन स्पर्धा सुरु झाली आहे.

ऑटोमोबाइल कंपन्यांच्या या वाढत्या स्पर्धेचा फायदा अर्थातच ग्राहकांना होत आहे. शिवाय वाहन कंपन्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये सुद्धा स्पर्धा सुरु आहे. सध्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रीक दोनचाकी गाड्या सुद्धा उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला जास्त ड्राइव्हींग रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक टु व्हीलरबद्दल सांगणार आहोत.

1. Ather 450X – Ather 450X या कंपनीची खासियतच इलेक्ट्रिक स्कुटर आहे. या स्कुटरला कंपनीने गेल्या जानेवारी महिन्यात लॉन्च केले होते. या गाडीत पावरफुल मोटार सोबतच अनेक कनेक्टेड टेक्नॉलजीचे फिटर्स दिले आहेत. या स्कुटरमध्ये 6kW ची इलेक्ट्रीक मोटार आहे ज्यामुळे 8bhpची पावर आणि 26Nm टॉर्क जनरेट होते. ही स्कुटर ३.३ सेकंदात ४० किलोमीटर प्रतितास इतके अंतर कापु शकते. या गाडीची ८५ किलोमीटर प्रति तास इतकी सर्वाधिक स्पीड आहे. 2.9kwh लिथियम आयन बॅटरी पॅक आहे ज्यामुळे फास्ट चार्जिंग होते.

ही गाडी एकदा फुल चार्ज झाली कि ती ११६ किलोमीटर अंतर पार करु शकते. या गाडीत राईड मोड आणि इको मोड असे दोन ड्राइव्ह मोड दिले आहेत. इको मोडवर ही गाडी ८५ किलोमीटर चालते तर राईड मोडवर ७५ किलोमीटर चालते. या गाडीला अॅंड्रॉइड बेस्ड युजर इंटरफेस दिले आहे. तसेच त्यात डार्क मोड आणि ब्लुटुथ कनेक्टिविटी फिचर दिले गेले आहे ज्याद्वारे चालक मोबाइलवर येणारे जाणारे कॉल्स रिसिव्ह किंवा कट करु शकतो. या गाडीची दिल्लीच्या शोरुममधील किंमत १.४७ लाख रुपये आहे.

2. बजाज चेतक – बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कुटर ही एक स्टाइलिश लुक असणारी स्कुटर आहे. ही स्कुटर गेल्या वर्षी लॉंच करण्यात आली होती. या गाडीमध्ये एंट्री-लेवल Urbane (अर्बन) वेरिएंट आणि टॉप-एंड Premium(प्रीमियम) वेरिएंट यासारखे दोन वेरिएंट दिले गेले आहे. या ई-स्कूटर मध्ये 3.8kWhची पावर आणि 4.1kWh पीक पावर दिली आहे. स्कूटर मध्ये दिल्या गेलेल्या खास ऑटोमैटिक ट्रांसमिशनमुळे रियर व्हील्सला पावर मिळते.

चेतक इ-स्कुटरला 3kWh लिथियम आयन बॅटरी दिली आहे. फुल चार्जिंग केल्यावर ही गाडी इको मोडमध्ये ९५ किलोमीटर आणि स्पोर्ट मोडवर ८५ किलोमीटर अंतर पार करते. ही रेंज वेगवेगळ्या ड्रायव्हींग स्टाइल आणि रस्त्याच्या स्थितीवर अवलंबुन असते. यात DRL सोबतच led हेडलैंप, फुली डिजिटल LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर, आणि स्मार्टफोन कनेक्टिविटी सारखे फीचर्स मिळतात.

स्कुटरच्या बॅटरीला फुल चार्ज होण्यासाठी जवळपास पास तास लागतात. तर फास्ट चार्जिंग सिस्टिममध्ये या गाडीची बॅटरी एका तासात २५ टक्के चार्ज होते. बजाजच्या मते चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची बैटरी लाइफ 70,000 किलोमीटर किंवा ७ वर्षे टिकते. या बैटरी वर कंपनी ३ वर्षे किंवा ५0,000 किलोमीटरपर्यंतच वारंटी देते. ही वॉरंटी केवळ फर्स्ट रजिस्टर्ड ऑनरसाठीच आहे. स्कूटर वापर जर कमर्शियल कामांसाठी केला जाणार असेल तर ही वॉरंटी लागु होत नाही. चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची शोरूम कीमत १,४२,६२० रुपये आहे.

3. TVS iQube (टीवीएस iQube) – ला नॉर्मल मोटरसाइकिल म्हणुन निर्माण करण्यापुर्वी पहिले इलेक्ट्रिक स्कूटर म्हणुन लॉन्च केले होते. टीवीएसच्या तुलनेत iQube फुल चार्जिंग वर ईको मोड मध्ये 75 किलोमीटर अंतर कापते. या स्कूटर मध्ये 4.4 kW चे इलेक्ट्रिक मोटर दिले आहे. ही मोटर 6 bhp पावरवर आणि 140 Nm टॉर्क जेनरेट करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 4.2 सेकंदात 0 से 40 किलोमीटर प्रति तास अंतर कापु शकते. त्यामुळेच या स्कूटर मध्ये SmartXonnect कनेक्टेड टेक्नोलॉजी सोबतच TFT इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एक ऑल-LED लाइटिंग, स्मार्टफोन कनेक्टिविटी, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि बूट लाइट सारखे फीचर दिले आहेत. शोरुममधील या गाडीची किंमत 1.08 लाख रुपये आहे.

इलेक्ट्रॉनिक स्कुटरच्या जगातात हिरो हा एक विश्वसनिय ब्रॅंण्ड आहे. हीरो ब्रॅण्ड जास्त रेंजच्या स्कुटर बनवण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. Hero Electric Optima कंपनी ही सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कुटर कंपन्यांपैकी एक आहे. या स्कुटरमध्ये 1.2 kW BLDC इलेक्ट्रिक मोटर मिळते. ही मोटार 1.34 bhp ची पावर जेनरेट करते. या स्कुटरची टॉप स्पीड ४२ किलोमीटर प्रति तास आहे. या स्कुटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मोटार आणि बॅटरी मिळते. एकदा फुल चार्ज केल्यावर ही गाडी वेरिएंटवर ५५ किलोमीटर ते १२० किलोमीटरचे अंतर पार करते. या स्कूटर मध्ये एलईडी हेडलैंप, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, रीजनरेटिव ब्रेकिंग, एंटी-थेफ्ट अलार्म आणि एक पोर्टेबल बैटरी मिळते. हीरो ऑप्टिम शोरूम कीमत 51,440 रुपयांपासुन सुरु होते, जी नंतर 78,640 रुपयांपर्यंत जाते.

4. Okinawa i-Praise – Okinawa i-Praise या  इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत म्हणजे यात डिटैचेबल 2.9kwh लीथियम बैटरी दिली आहे जी सहज बाहेर काढुन चार्ज करता येते. स्कूटरच्या बॅटरीसोबत ५ एंपीयरचा चार्जर दिला आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर १८० किलोमीटरपर्यंत अंतर कापते. तिची टॉप स्पीड ५५-७५ किलोमीटर प्रति तास आहे. ओकिनावा ने स्कूटरसाठी खास अॅप तयार केले आहे जे गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.

या अॅपमध्ये जियो फेंसिग, वर्चुअल स्पीड लिमिट, कर्फ्यू ऑवर्स, बैटरी हैल्थ ट्रैकर, एसओएस नोटिफिकेशंस, मॉनिटरिंग, ट्रिप्स, डायरेक्शन, मेंटिनेंस आणि व्हीकल स्टेटस यांसारखे फिचर्स दिले आहेत. जियो फेसिंगद्वारे युजर्स ५० मीटर ते १० किमी पर्यंतची रेंज सेट करु शकतात. जशी गाडी ती लिमीट क्रॉस करेल तसा युजर्सच्या फोनवर अर्लट येणे सुरु होईल. वर्चुअल स्पीड लिमिटद्वारे स्पीड अलर्ट मिळते. ओकिनावा i-Praise ची एक्स शोरुम किंमत १.१५ लाख रुपये आहे.

5. Hero Optima E2 – एक कन्वेशनल ICE स्कूटर प्रमाणे दिसते. तसेच 48V लिथियम-ऑयन बॅटरी सोबतयेते. या स्कूटर मध्ये 250 W BLDC इलेक्ट्रिक मोटर दिले आहे. स्कूटरची टॉप स्पीड २५ किलोमीटर आहे. फुल चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर ६५ किलोमीटर पर्यंत चालते. कंपनीचा दावा आहे की, Hero Optima E2 इलेक्ट्रिक स्कूटर केवळ ४ तासात फुल चार्ज होते. या स्कूटरची ऑन रोड किंमत ६२ हजार रुपये आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !