Headlines

भारतातील अजूनही राजमहाराजांचे जीवन जगणारे ९ शाही परिवार, जाणून घ्या कोण कोण आहेत ते !

भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अनेक विविध कालखंड भारत जगला आहे. अनेक आक्रमणे, लढाया, अतिक्रमण भारताने पाहत ते पचवून पुन्हा उभा देखील राहिला आहे. याच भारतामध्ये अनेक विविध राजवटी, राजेमहाराजे होऊन गेले. काही घराणेशाही तर रक्त भारतात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक काळ विविध प्रदेशांमध्ये विविध राजे महाराजे होऊन गेले. हल्लीच्या काळात आपल्याला असे कुठे हि राजेशाही असल्याचे आपल्याला दिसून येत नाही. पण पूर्वीच्या काळात या राजेशाहीचचा थाट काही औरच होता. तर आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रसिद्ध काही राजे घराणी. आजच्या काळात देखील या राजे घराणीशाहीचे वंशज राजे महाराजांसारखे जीवन जगतात.

उदयनराजे भोसले – सातारा वासियांच्या मनात उदयनराजे भोसले यांच्याविषयी एक वेगळा आदर आहे. शिवाजी महाराजांचे ते थेट १३ वे वंशज असल्याने सातारा आणि त्याच्या आसपास उदयनराजेंचा एक वेगळा दरारा आपल्याला सतत अनुभवायला मिळतो. तिक्ष्ण आणि भेदक नजर, गोरापान रंग, सरळ नाक, ६ फुटाची उंची, धिप्पाड शरीरयष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकच भर घालते. त्यांचे बोलणे फार ठामपणे आणि हळु आवाजात असते. त्यांना प्रतिप्रश्न करण्याची हिम्मत कुणी देखील दाखवित नाही.

त्यांच्याकडे काम घेउन घेऊन आलेल्यांचे काम पुर्ण करण्याची देखील त्यांची आपली एक अनोखी पध्दत आहे. समस्या घेउन घेऊन येणाऱ्याने समस्या काय आहे, आणि ती सोडविण्याकरता काय करावे लागेल फक्त एवढेच सांगायचे, जास्त फाफटपसारा सांगायचा नाही. त्यानंतर उदयनराजे ‘काम होईल’ असे म्हणतात. सांगितल्याप्रमाणे ते काम पुर्ण देखील करतात असा सातारा येथील रहिवाश्यांचा अनुभव आहे.

वाडियार परिवार – वाडियार परिवार मैसूर मधील एक राजघराणे आहे. या घराण्याचे प्रमुख यदुवीर राज कृष्णदत्त वाडयार आहेत. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी १३९९ ते १७६१ आणि १७९९ ते १९४७ या काळात ते मैसूर राज्याचे शासक होते. प्राप्त माहितीनुसार, या घराण्याकडे तब्बल १००० करोड इतकी धनसंपत्ती आहे. सोबतच अनेक विविध आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे आणि याशिवाय त्यांच्याकडे जगभरातील महागडी व अनेक विविध घड्याळे देखील आहेत.

शाही परिवार – जोधपूर – जोधपूरच्या शाही परिवार हा सर्वाधिक प्रसिद्ध आणि धनी परिवार म्हणून सर्वश्रुत आहे. या परिवाराचे मुख्य गज सिंह हे आहेत. या परिवाराकडे अरबोंमध्ये संपत्ती आहे. सोबतच या परिवाराकडे जगातील सर्वात मोठं घर आहे आणि त्या घरात तब्बल ३४७ रुम आहेत. या आलिशान घराच्या अर्ध्या भागाचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आले आहे आणि याची देखभाल जोधपूरच्या हा शाही परिवार करतो. या भव्यदिव्य वास्तूशिवाय त्यांच्या नावे इतर ही काही किल्ले आहेत.

गायकवाड परिवार – बडोदा – हे राजघराण मूळचे पुण्यातील आहे. या घराण्याचे मुख्य समरजित सिंह गायकवाड यांना २००० करोड इतकी संपत्ती वारसा म्हणून मिळाली. सयाजीराव गायकवाड हे देखील याच घराण्याचे आहेत. गायकवाड घराणे जगातील सर्वात मोठ्या खाजगी रेसिडेन्स असलेल्या लक्ष्मी पॅलेसमध्ये राहतात.

पतौडी नवाब परिवार – पतौडी परिवार तर सर्वानाच माहित आहे, जगभरात देखील हा परिवार प्रसिद्ध आहे. या परिवाराचे प्रमुख अली खान पतौडी हे होते. मन्सूर अली खान हे एक प्रसिद्ध क्रिकेटर होते आणि त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केले. या दोघांना तीन मुले. सैफ अली खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे, मुलगी सोहा अली खान अभिनेत्री आहे तर तिसरी मुलगी हि फॅशन डिझायनर आहे. सैफ अली खान यांची दोन लग्न असून पहिल्या पत्नीची दोन मुले आहेत; सारा अली खान व इब्राहिम अली खान. तर दुसरी पत्नी करीन कपूर हिला २ मुलगे आहेत.

राठोड परिवार – जयपूर – राठोड परिवाराचे राज्य अजून देखील सुरु आहे. हा परिवार जोधपूर येथील मारवाड प्रांतातील आहे. यांना सूर्यवंशी राजपूत म्हटले जाते. राठोड राजपुतांच्या युद्धांतील अद्वितीय पराक्रमामुळे त्यांना रणबंका राठोड असे देखील म्हटले जाते. स्वातंत्र्यापूर्वी या एकमेव घराण्याची दहापेक्षा जास्त रियासत होती. या परिवाराकडे जगातील सर्वात मोठे किल्ले आहेत.

मेवाड राजवंश – भारतातील सर्वात मोठा आणि सन्मानित शाही परिवार म्हणून मेवाड घराण्याची ख्याती आहे. प्रसिद्ध लढवय्ये महाराणा प्रताप या घराण्याचे वंशज होते. या परिवाराचे आता मुख्य श्रीजी अरविंद सिंह मेवाड आहेत आणि त्याचा पूर्ण परिवार उदयपूरमध्ये स्थित आहे. एच आर एच ग्रुप ऑफ हॉटेल्सचे ते चेयरमन आहेत. या परिवाराकडे राजस्थानमधील अनेक विविध हॉटेल, रिसॉर्ट आणि चॅरिटी संथ आहेत.

अली सीसर शाही परिवार – अभिमानी सिंह या परिवाराचे प्रमुख असून या घराण्याचे ते १६ वे वंशज आहेत. रणथंबोर आणि जयपूर या ठिकाणी त्यांचे मोठमोठाले महाल आहेत. इतकेच नव्हे तर हे फार मोठ्या संपत्तीचे धनिक असून काही हॉटेल देखील यांच्या मालकीची आहेत.

शाही परिवार – बिकानेर – बिकानेरच्या शाही परिवाराचे नेतृत्त्व त्यांच्या २५ व्या पिढीकडे आहे. महाराजा रवी सिंह हे या घराण्याचे २५ वे महाराजा असून त्यांच्याकडे या घराण्याचे नेतृत्त्व आहे. यांना वारसा म्हणून हि संपत्ती मिळाली असणं त्यांच्याकडे अनेक मोठमोठ्या इमारती आहेत. १४८८ मध्ये राव बिका यांनी बिकानेर शहराची स्थापना केली होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !