Headlines

स्वस्तात घर विकत घेण्याची नामी संधी, SBI बँक विकत आहे स्वस्तात घरं, जाणून घ्या कसे घेऊ शकता तुम्ही !

स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र काहीजणांची ही इच्छा पैशांअभावी पूर्ण होत नाही. पण ज्यांची स्वस्त घरे खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही नामी संधी चालुन आली आहे. देशाची सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया स्वस्त दरात प्रॉपर्टी चा लिलाव करणार आहे. हा लिलाव उद्यापासून म्हणजेच 30 डिसेंबर पासून सुरू होईल. तुमचा पण जर घर घेण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा.

जेणेकरून पुढे तुमची धावपळ होणार नाही. या प्रॉपर्टी मध्ये रेसिडेन्शिअल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही कमी पैशात तुमचे स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही प्रॉपर्टी डिफॉल्ट लिस्ट मध्ये आलेली आहे.

डिफॉल्ट प्रॉपर्टीचा होतो लिलाव – ज्या प्रॉपर्टीच्या मालकांनी त्या प्रॉपर्टी साठी घेतलेले लोन फेडले नसेल किंवा कोणत्याही कारणास्तव ते पैसे देऊ शकत नसतील. अशा सर्व लोकांची प्रॉपर्टी बँकेद्वारा ताब्यात घेतली जाते. एसबीआय सुद्धा वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव करत असते. या लिलावात बँक ती प्रॉपर्टी विकून त्यांचा पैसा वसूल करते.

एसबीआयने केले ट्विट – स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबतची माहिती ट्विटरवर ट्विट करून दिली. ट्विटमध्ये लिहिले आहे की तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी प्रॉपर्टी शोधत आहात का? जर तसे असेल तर तुम्ही एसबीआय ई-ऑक्शन मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. याबाबतचा अधिक माहितीसाठी http://bit.ly/2HeLyn0 या लिंक वर क्लिक करा.

या लिलावात जर तुम्ही भाग घेत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा – या ई-लिलावाद्वारे थकबाकी वसूल करण्यासाठी एसबीआयने कर्ज न फेडू शकणाऱ्यांची संपत्ती लिलावात ठेवली आहे. आणि याबाबतची माहिती त्यांनी फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून दिली आहे. तसेच काही प्रमुख वृत्तपत्रातून जाहिराती सुद्धा केल्या आहेत.

लिलावात लागणारी बोली ही वास्तविक बाजार मूल्यापेक्षा कमी असेल. मेगा इ-लिलावादरम्यान लोकांकडे रेसिडेन्शिअल, इंडस्ट्रियल आणि कमर्शियल प्रोपर्टी वर बोली लावण्यास वेळ असेल. या व्यतिरिक्त प्रॉपर्टी साठी EMD महत्त्वाचा असेल. KYC शी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स बँकेच्या ब्रांच मध्ये जमा करावे लागतील. व्हॅलिड डिजिटल सिग्नेचर मिळवण्यासाठी ई-लिलावकर्ता किंवा इतर अन्य कोणत्याही अधिकृत एजन्सीशी संपर्क करू शकता.

जेव्हा प्रॉपर्टी वर बोली लावणारे व्यक्ती इएमडी आणि केवायसी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स बँकेत जमा करतील त्यानंतर रजिस्टर लॉगिन आयडी आणि पासवर्ड ई- लिलाव कर्त्यांना ई-मेल द्वारे पाठवला जाईल. लिलावाच्या नियमानुसार बोली लावणाऱ्यांना लिलाव ज्या तारखेस असेल त्यावेळी लॉगिन राहणे आवश्यक आहे.

येणा-या दिवसात होणारा लिलाव – पुढील सात दिवसात- ७५८ रेसिडेन्शिअल, २५१ कमर्शियल, ९८ इंडस्ट्रियल.
पुढील तीस दिवसांत- ३०३२ रेसिडेन्शिअल, ८४४ कमर्शियल, ४१० इंडस्ट्रियल. एसबीआय ऑक्शन बाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर विजिट करू शकता. https://bankeauctions.com/Sbi ; https://sbi.auctiontiger.net/EPROC/;
https://ibapi.in;  https://mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !