ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ असलेल्या खिडकीला अधिक रॉड का लावलेले असतात, जाणून घ्या !

2231

रोज करोडो लोक रेल्वे ने प्रवास करत असतात. लोकांना आपल्या हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय रेल्वे गेली कित्येक वर्षे मदत करत आहेत. भारतीय रेल्वे देशातील प्रत्येक राज्यात जोडली गेली असून ती प्रवाशांना त्यांच्या गावी किंवा हव्या असलेल्या शहरात पोहोचण्यास मदत करते.
अधिकतर लोक रेल्वेतील स्लीपर किंवा जनरल डब्यातून प्रवास करणे पसंत करतात. कारण या डब्यांचे भाडे खूप स्वस्त असते व कमी पैशात आरामदायक प्रवास केला जाऊ शकतो. जर तुम्ही कधी रेल्वेने प्रवास केला असेल तर तुम्ही एक गोष्ट जरूर पाहिली असेल ती म्हणजे स्लीपर आणि जनरल डब्यांच्या दरवाज्याच्या बाजूला असलेल्या कोचला ज्या खिडक्या असतात त्याला खूप सार्‍या सळ्या लावलेल्या असतात.
तर कोच मधील इतर खिडक्यांना तुलनेने कमी सळ्या असतात. असे करण्यासाठी एक कारण आहे हेच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रेल्वेमध्ये दरवाजाच्या बाजूच्या कोचला अधिक सळ्या असलेल्या खिडक्या लावल्या जातात यामागे एक गमतीशीर कारण आहे. या खिडक्यांना अधिक सळ्या लावल्या जातात कारण चोरी होऊ नये. या खिडक्या दरवाजांच्या जवळ असतात.
त्यामुळे कोणताही चोर आरामात खिडकीतून हात घालून लोकांचे सामान चोरू शकतो. याव्यतिरिक्त रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व प्रवासी झोपलेले असतात. त्या वेळी चोर आरामात खिडकी द्वारे हात आत मध्ये घालून लोकांचे सामान चोरून पळू शकतो.
रेल्वे प्रवासात प्रवाशांची चोरांपासून सुरक्षा व्हावी यासाठी रेल्वेच्या दरवाजा जवळ असलेल्या खिडक्यांना अधिक सळ्या असतात. जेणेकरून चोऱ खिडकीत हात घालून काही चोरू शकत नाही आणि प्रवासी सुद्धा सामाना मुळे घाबरून प्रवास करणार नाहीत.
हे वाचा – पती पत्नीच्या वयात, पती मोठा व पत्नी लहान का असावी, जाणून घ्या कारण !
रेल्वे संबंधित काही खास माहिती –
१) भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी रेल्वे आहे. २) रेल्वे विभागाद्वारे एकूण 13000 ट्रेन सोडल्या जातात. या रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यातून फिरतात. ३) भारतीय रेल्वेमधून रोज सुमारे अडीच करोड यात्री प्रवास करतात. ४) भारतीय रेल्वे मध्ये एकूण १.४ मिलियन लोक काम करतात. ५) दिल्ली मध्ये असलेले रेल्वे संग्रहालय हे आशियातील सर्वात मोठे संग्रहालय आहे. दिल्ली व्यतिरिक्त कोलकत्ता, पुणे आणि अजून काही शहरांमध्ये सुद्धा संग्रहालये बनवली आहे.
६) नवी दिल्ली येथील रेल्वेस्टेशन हे जगातील सर्वात मोठे रुट रीले इंटरलॉकिंग सिस्टीम आहे. ७) गोरखपुर रेल्वे स्टेशन हे जगातील सर्वात मोठे रेल्वे प्लेटफॉर्म आहे. याची लांबी सुमारे ४,४३० फूट आहे. ८) देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा जम्मू काश्मीर राज्यात आहे. हा बोगदा ११.२५ किलोमीटर लांब आहे. ९) भारतातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला ठाणे येथून सोडण्यात आली होती.

हे वाचा –
तब्बल १२ वर्षानंतर आयुषमान खुराणा आणि रामायण मधील त्रिजटा यांच्या नात्याचा राज कळाला !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !