वडिलोपार्जित संपत्तीवर मुलीचा हक्क असतो की नाही, जाणून घ्या येथे !

3251

संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे तुम्ही कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित. कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो. संपत्ती अशी गोष्ट आहे जी कुटुंबामध्ये फूट पाडण्यास कारणीभूत ठरते. घरातील वडिलांचा किंवा कोणत्याही एका मोठ्या माणसाचा देहांत झाल्यावर त्याची सर्व संपत्ती कोणाला मिळणार यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहते.

आणि त्यात जर भाऊ आणि बहीण असतील तर अधिक कल भावाकडे जातो कारण आपल्याकडे अजूनही काही अंशी पुरुषोत्तक संस्कृती आहे. ‌‌बऱ्याचदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की लग्न झालेल्या मुलीचा तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवर हक्क असतो का? बऱ्याच लोकांना याबद्दलच्या कायदेशीर तरतुदी माहीत नाहीत. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे याबद्दल थोडी माहिती देणार आहोत.

जगातील अनेक देशांपेक्षा भारतातील स्त्रियांविषयी आणि त्यांच्या समान हक्कांविषयीचे कायदे खूप प्रगत आहेत. भारतीय घटनेनुसार १९५० सालापासून प्रत्येक भारतीय नागरिकाला समान हक्क दिले आहेत. आपल्या भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे वारसाहक्कासंबंधीचे कायदे प्रत्येक धर्मासाठी वेगळे आहेत. १९५६ मध्ये ‘हिंदू वारसाहक्क’ हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भातील आहे.

भारतीय घटनेने नागरिकांना दिलेल्या समान हक्कांना अनुसरून ‘हिंदू वारसाहक्क’ या कायद्यात स्त्रियांना मालमत्तेवर हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, मात्र जुन्या कायद्यानुसार फक्त अविवाहित मुलीला मालमत्तेमध्ये वाटणी देण्याची तरतूद होती. तसेच मालमत्ता असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मुलींचा हक्क त्यावर आहे असे मानले जायचे.

मुलाचा हक्क मात्र त्याच्या जन्मानंतरच दिला जायचा. २००५ च्या पूर्वी हिंदू उत्तराधिकार कायद्यात मुलींकडे हिंदू एकत्रित कुटुंबाचे सदस्य म्हणून पाहिले जात होते. म्हणजेच लग्नानंतर कागदोपत्री ती तिच्या माहेरच्या कुटुंबाचा भाग नाही असे मानले जायचे. २००५ च्या तरतुदीनंतर हा कायदा बदलण्यात आला.

९ सप्टेंबर २००५ पासून हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा लागू करण्यात आली. कायद्यानुसार असे म्हटले आहे की या तारखेच्या आधी किंवा नंतर मुलगी जन्माला आली असली तरी तिच्या भावाला व तिला वडिलांच्या संपत्तीत तिला समान वाटा असेल. तसेच ९ सप्टेंबर २००५ रोजी वडील जिवंत असतानाच मुलगी आपल्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळवू शकते. या तारखेपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असता, मुलीचा वडिलांच्या मालमत्तेवर कोणताही हक्क नाही आणि वडिलांनी स्वत: कमवलेली मालमत्तेची त्याच्या इच्छेनुसार विभागणी केली जाते.

टीप – सदरची माहिती इंटरनेट सोर्ससचा वापर करून गोळा केलेली आहे. तुम्हाला शंका असल्यास योग्य कायदेतज्ञांचा सल्ला घ्यावा !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !