मुकेश अंबानी यांच्या घरी येणाऱ्या दुधाची किंमत ऐकून हैराण व्हाल !

देशातील मोठमोठ्या उद्योगपतींपासून ते बॉलिवुड पर्यंतचे सर्व कलाकार त्यांच्या फिटनेस ची काळजी घेतात. स्वतःच्या फिटनेसची हे लोक पुरेपूर काळजी घेतात. त्यासाठी उत्तम प्रतीच्या व महागड्या फूड प्रॉडक्ट चे सेवन करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का, मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षयकुमार यांसारखे दिग्गज व्यक्ती स्वतःच्या फिटनेस साठी कोणत्या डेअरीचे दूध पितात? जर माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, या दिग्गज व्यक्ती कोणत्या साध्यासुध्या नव्हे तर हायटेक फॉर्म चे दुध पितात. या डेअरीच्या १ लिटर दुधाची किंमत सर्वसामान्य दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
महाराष्ट्रातील पुणे येथे भाग्यलक्ष्मी नावाची डेअरी आहे. या डेअरीचा ग्राहकांच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी पासून बॉलिवूडमधील इतर दिग्गज कलाकारांचे नाव सुद्धा सहभागी आहे. भाग्यलक्ष्मी डेअरी ची सुरुवात देवेंद्र शाह यांनी केली. डेअरीच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांचे फक्त १७५ ग्राहक होते. त्यानंतर ही संख्या हळूहळू वाढत जाऊन ती २२,००० पर्यंत पोहोचली आहे. सध्या या डेअरीच्या १ लिटर दुधाची किंमत १५२ रुपये आहे.

देवेंद्र शहांच्या डेअरी मधील दूध महाराष्ट्रातील अनेक भागात सप्लाय होते. पुण्याहून मुंबई पर्यंतचे अंतर १६३ किलोमीटर आहे जे पार करण्यास तीन तास लागतात. मुंबईत सुद्धा भाग्यलक्ष्मी डेअरी चे दुध विकत घेणारे अनेक सप्लायर आहेत त्यामुळे रोज पुण्याहून मुंबईला या दुधाची विक्री होते. या डेअरीची डिलिव्हरी व्हॅन रोज सकाळी ५:३० ते ७:३० मध्ये मुंबईतील लोकांच्या घरी दूध सप्लाय करते. या डेअरीच्या ग्राहकांना ‘प्राइड ऑफ काऊ’ साठी एक लॉगिन आयडी दिलेला असतो. ज्याद्वारे ते ऑर्डर बदलू शकतात, रद्द करू शकतात किंवा डिलेव्हरीची जागा बदलू शकतात.
भाग्यलक्ष्मी डेअरीत दूध देणाऱ्या गाईंची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या साफसफाईत विशेष लक्ष दिले जाते. येथे गाईंसाठी रबर मॅट घातले आहे. ज्याची दिवसातून कमीत कमी तीन वेळा सफाई केली जाते. सोबतच या गायींना पिण्यासाठी आरओ चे पाणी दिले जाते. तर खाण्यासाठी सोयाबीन, अल्फा गवत, हंगामी भाज्या व मक्याचा चारा दिला जातो. या डेअरी ची विशेषता म्हणजे येथे २४ तास सतत स्लो साऊंड म्युझिक चालू असते.
भाग्यलक्ष्मी डेअरी ची सर्वात खास बाब म्हणजे येथे २००० डच होल्स्टीन नस्ल गाय आहेत. हे फार्म २६ एकरात बनले असून येथे रोज २५००० लिटर दुधाचे उत्पादन होते. येथे रोज सकाळी २००० गाईंचे दूध काढले जाते. विशेष म्हणजे येथील गाईंचे दूध काढण्यापासून ते दुधाचे पॅकिंग करण्यापर्यंतची सर्व कामे मशीनींच्या आधारे होतात.
इन्वेस्टर रिलेशन्स सोसाइटी मार्फत मिळालेल्या रिपोर्टनुसार, या दुधाची वाढती लोकप्रियता पाहता २०२० मध्ये या डेअरीचे मार्केट वाढून १४० मिलियन डॉलर (९,०८,६७० करोड़ रु) होऊ शकते. तर २०१३ मध्ये या डेअरीचे मार्केट ७० मिलियन डॉलरच्या (४,५४,३३५ करोड़ रु) आसपास होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.