Headlines

तुळसी विवाहात तुळसीच्या पाठीमागे ‘ऊस’ का उभा केला जातो आणि तुळशीत ‘लाह्या’ का टाकतात, जाणून घ्या तुळसी विवाहाची संपूर्ण माहिती !

तुलसी विवाहाच्या पाठीमागची कहाणी – दिवाळीनंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी तुळशीचे लग्न लागते. कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह लावला जातो. तुळशीचे लग्न लावण्यापाठी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पूर्वी जालंदर नावाचा एक राक्षस होता. त्याने त्याच्या शक्तीने देवांवर देखील विजय मिळवला. आणि दैत्यांचे जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

जालंधर ची पत्नी महापतिव्रता होती. केवळ तिच्यामुळेच जालंधर तिन्ही लोकात विजय ठरत होता. एकदा काय झालं धरणे इंद्रपुरी वर हल्ला करून इंद्राला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याचे अनेक देवांसोबत युद्ध झाले. देवांना त्याच्यापुढे शरणागती पत्करावी लागली. तेव्हा भगवान विष्णू जालंधरास युद्ध ठरवण्यासाठी योजना आखली.

जालंधर याची पत्नी वृंदा हिच्या पतिव्रत्यामुळे जालंदर आला बलाढ्य सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे लक्षात आल्यावर भगवान विष्णूनी एक युक्ती केली. भगवान विष्णुनी दोन वाहनांकडून जालंधर युद्धात मारला गेला अशी अफवा पसरवली आणि जालंधरा सारखे हुबेहूब रूप धारण करून ते वृंदा समोर शरीराच्या दोन तुकड्यात पडून राहिले.

आपल्या पतीला अशा रुपात पाहून वृंदा चा शोक अनावर झाला. त्यावेळी एका खोट्या साधूने संजीवनी मंत्राचा वापर करून जालंधराचे रूप धारण केलेल्या विष्णूला जिवंत केले. आपला पती जिवंत झाला या आनंदात वृंदाने जालंधराचे रूप धारण केलेल्या विष्णूंना मिठी मारले. तिच्या या मिठीमुळे तिचे पातिव्रत्य भंग पावले.

हे सर्व अजाणतेपणे जरी घडले असले तरीही वृंदाचे पातिव्रत्य भंग पावल्यामुळे जालंधरचा लढाईत मृत्यू झाला. या सर्व प्रकाराची खरी माहिती कळताच वृंदाने क्रोधित होऊन विष्णूला शाप दिला कि, त्यांना पत्नी वियोग घडेल व पत्नी शिवाय त्यांना दोन माकडांचे सहाय्य घ्यावे लागेल. तिच्या या शापामुळे विष्णूंनी रामावतार घेतल्यावर असेच घडले. वृंदाने अविकाष्ट भक्षण केले.

भगवान विष्णूंना देखील त्यांनी एका महासाध्वीला फसवून तिचा नाश केल्यामुळे वाईट वाटले. भगवान विष्णू तेथेच वृंदेच्या जवळ बसून राहिले. भगवान विष्णू यांची ती अवस्था पाहून माता पार्वतीने वृंदेच्या रक्षेवर तुळस आवळा मालती यांचे बी पेरले. त्यातून तीन झाडे उगवली. यातील झाडांपैकी तुळस ही सर्वगुणसंपन्न असल्यामुळे भगवान विष्णूंना ती प्रिय झाली.

भगवान विष्णू यांना तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेदेखील म्हणतात. वृंदाने पुढे द्वापार युगात रुक्मिणी म्हणून जन्म घेतला. आणि विष्णूच्या अवतारात असलेल्या श्रीकृष्णांना वर म्हणून नेमले. हा दिवस होता कार्तिक शुद्ध द्वादशी चा. पुढे ही प्रथा हिंदू लोकांमध्ये रुक्मिणी कृष्ण विवाह म्हणजेच तुळशी विवाह म्हणून प्रसिद्ध झाली.

कसा करतात तुलसी विवाह – तुळशीच्या लग्नात तुळस ही वधू तर कृष्ण हा वर असतो. या विवाहात मामा म्हणून ऊसाला उभे केले जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळस वृंदावन सारवून सुशोभित केली जाते. तुळशी भोवती रांगोळी काढली जाते व ती फुलांनी सजवली जाते. या दिवशी तुळशीच्या वृंदावनात ऊस आवळे आणि चिंचा टाकल्या जातात. तुळशीच्या चारी बाजूंनी उसाचा मंडप उभा केला जातो. त्यानंतर तुळशीसमोर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून त्याची पूजा केली जाते.

रात्र व्हायच्या आत तुळशीची पूजा करून ऊस रचून केलेल्या मांडवा भोवती आरती आणि दिवे लावले जातात. तुळशीच्या या विवाहाला आलेल्या लोकांना लाह्या कुरमुरे ऊस यांचा नैवेद्य दिला जातो. हे विवाह लावणार्‍याला कन्यादानाचे फळ मिळते असे म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्यास सौभाग्य संतती संपत्ती विद्या यासारख्या गोष्टी लाभतात.

काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर विवाह होम करण्याची प्रथा आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशी च्या दिवशी तुळशीचा विवाह झाल्यावर चातुर्मासात ज्यांनी उपवास केला होता. त्या उपवासाची समाप्ती करण्याची वेळ असते. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज केले असतात ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन त्यानंतर ते स्वतः सेवन करण्याची पद्धत होती.

यापाठी असेही म्हटले जाते की आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात व कार्तिक शुद्ध एकादशीला ते जागे होतात. निद्रेतून जेव्हा भगवान विष्णु जागे होतात त्या दिवसाला प्रबोधोत्सव असे म्हटले जाते. प्रबोधोत्सव आणि तुळशीचे लग्न एकत्र साजरे केले जातात. हिंदू धर्मात तुळशीचे लग्न लागल्यानंतर घरातील विवाह संबंधीतील कार्यास सुरुवात होते.

हिंदू परंपरेत असेही म्हटले जाते की तुळशीचे केवळ दर्शन घेतल्यामुळे हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तुळशीचे पान डोक्यावर ठेवल्यास गंगा स्नान केल्याचे पुण्य लाभते. याशिवाय व्यक्ती मरण पावल्यावर तिच्या तोंडात तुळशीपत्र ठेवले जाते. असे केल्यास मृत व्यक्ती थेट वैकुंठात जाते असे म्हटले जाते.

तुळशीचे वैज्ञानिक गुणधर्मही आहेत. तुळस कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात बाहेर सोडते जे मानवी शरीरास गुणकारी असते. दारात तुळशीचे झाड असल्यास हिवतापाचे जंतू घरात शिरत नाहीत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.