आता रात्री दहानंतर टीसी तिकीट चेक करण्यासाठी त्रास देणार नाही, भारतीय रेल्वे ने लागू केले हे नवीन नियम !

442

भारतीय रेल्वेमधून आपण सर्वांनीच प्रवास केलेला आहे. त्यामुळे या प्रवासादरम्यान येणाऱ्या अनुभवाची तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती असेलच. भारतीय रेल्वेतून प्रवास करताना प्रत्येक स्टेशनच्या वेळी टीसी येऊन तुमच्याकडे तिकीट दाखवण्याची मागणी करत असतो प्रवाशांना हैराण करत असतो. असे सारखे सारखे तिकीट चेक करून प्रवासी देखील वैतागलेले असतात.
परंतु जेव्हा प्रवास हा रात्रीच्या वेळी असतो आणि तुम्ही प्रवासादरम्यान झोपलेले असाल आणि मध्येच तिकीट तपासण्यासाठी टीसीने येऊन उठवले तर संपूर्ण झोपेचा सत्यानाश होतो आणि आपली चिडचिड होऊ लागते. परंतु यापुढे असे होणार नाही . या पुढे दहा वाजल्या नंतर टीसी येऊन त्रास देणार नाही.

भारतीय रेल्वे तयार केलेल्या नवीन नियमानुसार टीसी रेल्वेत सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंतच तिकीट तपासणी करू शकतो. रात्री दहानंतर टीसी कोणत्याही प्रवाशाला उठवून त्रास देऊ शकत नाही. सध्या रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारची गाईडलाईन्स तयार करून ठेवली आहे. मात्र रात्री 10 नंतर रेल्वेत चढलेल्या या प्रवाशांसाठी हा नियम लागू होत नाही.
नियमानुसार प्रवासादरम्यान रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत मिडल बर्थ वाला प्रवासी सीटवर झोपू शकतो. याचाच अर्थ रात्री १० च्या आधी जर एखादा प्रवासी मिडल बर्थ वाली सीट उघडत असल्यास अन्य प्रवासी त्याला विरोध करू शकतात. तसेच सकाळी सहानंतर ती सीट खाली करावीच लागते. शिवाय ट्रेन सुटल्यानंतर पुढील दोन स्थानकापर्यंत किंवा एक तास तरी सीट इतर कोणाही व्यक्तीस देऊ शकत नाही.