Headlines

शेअर मार्केट किंग राकेश झुंजूनवाला यांनी मृत्यू नंतर आपल्या कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली तब्बल एवढ्या करोड रुपयांची संपत्ती !

शेअर बाजारामधील मातब्बर गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकीत कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडून नवा विक्रम बनवला आहे. शेअर बाजारात केवळ 5000 रुपयांपासून गुंतवणूकीला सुरुवात करणारे झुनझुनवाला आज हजारो करोड रुपयांचे मालक होते. . शेअर बाजारातील गुंतवणूकीनंतर राकेश झुनझुमवाला आता एअरलाइन्सच्या बिझनेसमध्ये उतरणार होते. राकेश यांचे वडील मुंबई इन्कम टॅक्समध्ये कमिश्नर होते. त्यावेळी राकेश सीएचा अभ्यास करत होते.

राकेश झुनझुनवाला यांना भारताचा वॉरेन बफेट म्हणून ओळखले जायचे. राकेश यांनी 1985 मध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकीला सुरुवात केली होती. त्यावेळी ते कॉलेजमध्ये शिकत होते. त्यावेळी बीएसइ सेंसेक्स 150 च्या आसपास होता. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांची संपूर्ण संपत्ती सध्या 6 मिलियन डॉलर म्हणजेच 34,387 करोड रुपये आहेत.

राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारातील खरे यश टाटा कंपनीकडून मिळाले. तिथे त्यांनी 1986 मध्ये पाच लाख रुपये गुंतवले होते. त्यांनी टाटा टीचे 5000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले होते, जे वाढून 3 महिन्यात 143 रुपये झाले. म्हणजेच केवळ तीन महिन्यात राकेश यांनी गुंतवणूकीची मुळ रक्कम 3 पट वाढवली होती.

मध्यंतरी शेअर मार्केटवर बिग बुलचे राज्य होते. मात्र 1992 मध्ये जेव्हा मेहता घोटाळा उघडकीस आला तेव्हा राकेश झुनझुनवाला यांनी स्टॉक कमी करून मोठी कमाई केली. या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ते बीअर ग्रुपचे सदस्य होते. तेव्हा त्यांनी कमी विक्रीतून जास्त कमाई केली होती. तेव्हा शेअर बाजारावर बियर आणि बुल यांचे वर्चस्व होते.
राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या सुद्धा शेअर मार्केट गुंतवणूकदार होत्या. 2003 राकेश यांनी रेर इंटरप्राइजेस नावाची स्वताची कंपनी सुरु केली. राकेश झुनझुनवाला स्वतः या कंपनीच्या अंतर्गत शेअर बाजारात गुंतवणूक करतात.

31 मार्च 2021पर्यंतच्या माहितीनुसार झुनझुनवालाकडे एकूण 37 स्टॉक होते. ज्यात टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्पोरेशन, डीबी रिअॅलिटी, टाटा कम्युनिकेशन्सचे 19695.3 करोड़ रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांनी सर्वात जास्त गुंतवणूक टाइटन कंपनीत केली. त्यात त्यांनी 7879 करोड़ रुपये होती. त्यानंतर त्यांनी टाटा मोटर्समध्ये 1474.4 कोटी रुपये आणि क्रिसिलमध्ये 1063.2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

एका मुलाखतीत राकेश झुनझुनवाला म्हणाले होते की ज्या बॅंका अकार्यक्षम आहेत त्यांचे खर्च-उत्पन्नाचे प्रमाण खूप जास्त आहे जे खूप वेगाने खाली येईल.यासोबतच भारताचा विकास 14-15 टक्के नाममात्र डीजीपीच्या दराने होईल, तर यावर्षी देशाचा विकास 10-12 टक्के दराने होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.एवढेच नाही तर या महामारीचा शेअर बाजारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे झुनझुनवाला म्हणाले होते. अशा आव्हानांसाठी भारताची अर्थव्यवस्था चांगली तयार आहे.