अहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट, सगळ्या विषयात भावड्याने मिळवले ३५ गुण, पहा कोण आहे हा !

612

परीक्षा म्हटलं की धडकी भरलीच म्हणून समजा…… मग येतात वेगवेगळ्या तऱ्हा असलेले विद्यार्थी. एकच विषय आवडतो, गणित विषय न आवडणारे, इतिहासाची इसवी सन लक्षात न राहणारे, भूगोलाचा पेपरचा दिवशी अगदी गोल होणारे विद्यार्थी…… आणि त्यात दहावीचे हुशार बेस्ट ऑफ 5 चा विचार करून एका विषयाला वाळीत टाकून बाकी विषयांचा कडक अभ्यास करणारे विद्यार्थी. अशी तऱ्हा असलेले विद्यार्थी आणि त्यांचं निकालाचं टेन्शन आणि त्या निकालाचे विविध किस्से.

कोणी ८० अधिक टक्क्यांमध्ये पण नाखूष असतो तर कोणी फक्त ३५% मिळाले तरी पास झालो एकदाचा म्हणणारे. त्यात आजच दहावीचा निकाल जाहीर झालाय. दहावीच्या या निकालाचा एक किस्सा आज गाजतोय. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील एका विद्यार्थ्याचा हा किस्सा आहे. पुण्यातील लोकांची तर जगभरात चर्चा होतं असते. अहो पुणे तिथे काय उणे!

पुण्यातील गंज पेठेतील रमणबाग शाळेतील शुभम जाधव हा विद्यार्थी सगळ्या विषयात नापास होता होता वाचला आहे. दहावीमध्ये त्याला ३५% गुण मिळाले आहेत. शुभम जाधवला मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, इतिहास, भूगोल अशा सर्वच विषयात ३५ गुण मिळाले आहेत. जणू नवा रेकॉर्डचं त्याने मांडलाय, महत्त्वाचं हे आहे की तो पास झाला…..

दहावी, बारावीमध्ये अव्वल आलो तर चांगली नोकरी मिळते, त्यामुळे मन लावून अभ्यास करून चांगले गुण मिळवणं हे एकच विद्यार्थ्याचं कामं असत. पण आता दहावी, बारावीमध्ये अव्वल न येता आयुष्यात नावं काढलं, खूप मोठे झालेत असे अनेकजण आपण पाहिलेत. प्रत्येकजण पुस्तकी किडा नसला तरी आयुष्यात नावं कमवून चांगलं कामं करण्याची धमक प्रत्येकामध्ये असते. शुभम देखील पुढे जाऊन चांगलं नाव कमावेल अशीच अशा आहे! शुभम जाधवला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !