युवराज सिंह सोबत ६० करोड किंमतीच्या आलिशान घरात राहते हेजल कीच !

574

अभिनेत्री हेजल केज हिने नुकताच तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. हेजलने तिच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. त्यानंतर तिने काही हॉलिवूड चित्रपटात व मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर हेजल बॉलिवूडमधील बिल्ला व बॉडीगार्ड या चित्रपटांमध्ये दिसली होती. हेजलने 2016 मध्ये माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सोबत लग्न केले. लग्नानंतर हे जोडपे मुंबईमध्ये राहते.
मुंबईसारख्या मायानगरीत अनेक सिने स्टार्स तर राहतात च पण त्याच बरोबर आता मुंबईत भारतीय क्रिकेटपटू देखील स्थायिक होऊ लागले आहेत. लग्नानंतर युवराज सिंह सुद्धा मुंबईत स्थायिक झाला. मुंबईत ज्या इमारतीमध्ये युवराज सिंह व हेजल राहतात त्याच इमारतीत भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सुद्धा राहते. त्यांच्या घरात युवराजच्या क्रिकेटचे फोटो लावलेले आहेत. मुंबईच्या आधी युवराज चंदीगड मध्ये त्याची आई शबनमसोबत राहत होता. लग्नानंतर तो मुंबईमध्ये शिफ्ट झाला.
हेजल चे घर सोळा हजार स्क्वेअर फूट मध्ये पसरलेले आहे. हेजल आणि युवराजच्या घरी दरवर्षी गणपतीची स्थापना होते. एवढेच नाही तर युवराजची बरीचशी प्रॉपर्टी गुरुग्राम मध्ये सुद्धा आहे. हेजल आणि युवराजच्या अफेयर ची चर्चा इंडस्ट्रीमध्ये चांगलीच रंगली होती त्यानंतर शेवटी 2016 मध्ये दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीमध्ये युवराज ने त्याच्यावर शेजरच्या अफेयर बद्दल बरेच खुलासे केले होते. युवराजने सांगितले की त्याला हेजल ला लग्नासाठी तयार करण्यास बरीच मेहनत घ्यावी लागली होती. युवराज ने हेजल ला नुसते कॉफी पिण्यास घेऊन जायला ३ वर्ष लागली होती. परंतु त्यावेळी युवराजने सुद्धा हार मानली नाही. युवराज सोशल मीडिया फेसबुक सारख्या माध्यमांमध्ये हेजलचा फ्रेंड बनला. परंतु गमंत म्हणजे इथेही युवराजला लगेच यश मिळाले नव्हते.
मुलाखतीमध्ये युवराज ने सांगितले कि फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यावर हेजल ती तीन महिन्यानंतर एक्सेप्ट केली होती. त्यानंतर त्यांचे हळू हळू बोलणे वाढत गेले. युवराजच्या म्हणण्यानुसार हेजलने युवराजला कॉफीसाठी कधीच नकार दिला नव्हता परंतु कॉफीसाठी तयार झाल्यावर तेजल लगेच तिचा फोन स्विच ऑफ करायची.