सनी देओलच्या पत्नीबद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !

590

बॉलीवूड मध्ये जेव्हा एखादा अभिनेता प्रसिद्ध होतो त्यावेळी त्याच्या सोबत आपसुकच त्याची पत्नी सुद्धा प्रसिद्ध होते. आता तर सोशल मिडियाचा जमाना आहे त्यामुळे कलाकारांचे संपूर्ण कुटुंबच सोशल मीडिया मार्फत प्रसिद्ध होते असे बोलण्यास हरकत नाही. परंतु काही कलाकारांच्या पत्नी आशा देखील आहेत ज्यांना मीडियाच्या लाईमलाईटमध्ये येणे आवडत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना जास्त काही माहित नसते. या पत्नी पैकी एक आहे ती म्हणजे सनी देओल ची पत्नी पूजा देओल. आपण सर्वच सनी देओल ला चांगलेच ओळखतो. बॉलीवूड करिअर चांगलेच गाजले आहे. सनीने त्याच्या करिअरमध्ये अनेक चांगले व हिट सिनेमे दिले. शिवाय तो अजूनही काही चित्रपटांमध्ये दिसतो.
सनी देओलच्या परिवाराबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे वडील धर्मेंद्र आणि लहान भाऊ बॉबी देओल यांना आपण सर्वच ओळखतो. परंतु सनीची पत्नी पूजा देओल बद्दल जास्त काही माहित नाही. याचे कारण म्हणजे पूजाला बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेत सहभागी होण्यास आवडत नाही. म्हणूनच ती कधीच सनी सोबत कोणत्याही इव्हेंट्स किंवा अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसत नाही.
सनी देओल ची पत्नी पूजा देवल खरच खूप सुंदर आहे. तिच्या तारुण्याच्या काळात ती अभिनेत्री म्हणून नशीब आजमावू शकत होती. परंतु तिने पडद्यावर दिसण्याऐवजी पडद्यामागे राहून काम करणे पसंत केले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु सनी देओल ची पत्नी पूजा देओल ही एक लेखिका सुद्धा आहे. देओल फॅमिलीच्या यमला पगला दिवाना या चित्रपटाचे लेखन करण्यात पूजाने महत्त्वाची भूमिका निभावली होती.
सनी देओल आणि पूजा देवल यांचे लग्न सुद्धा रहस्यमयरित्या झाले असे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी १९८४ मध्ये लग्न केले. हा तोच काळ आहे जेव्हा एक वर्षापूर्वी सनी चा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्यांच्या लग्नाचा फोटो सुद्धा एका मॅगझीनच्या कव्हर मध्ये छापून आला होता. लग्नानंतर सनी व पूजाला दोन मुले झाली. एकाचे नाव करण देओल दुसऱ्याचे नाव राजवीर देओल असे आहे. करणे बॉलिवूडमध्ये पल पल दिल के पास या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पूजा तिच्या दोन्ही मुलांच्या खूप जवळ आहे. नेहमी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी झटत असते. कदाचित त्यामुळेच तिला बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत येऊन शो ऑफ करण्यास वेळ मिळत नसावा.
पूजा बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ची खूप मोठी चाहती आहे. एका मुलाखतीदरम्यान पूजाने या गोष्टीचा खुलासा केला की ती ऐश्वर्या रायची चाहती आहे. एक काळ असा होता जेव्हा ती ऐश्वर्या सारखे दिसण्याच्या प्रयत्न करायची. लूक बद्दल बोलायचे झाल्यास पूजा सुद्धा कोणत्या ही अभिनेत्री पेक्षा कमी नाही. ती सुद्धा दिसायला खूप सुंदर आहे.