तुमच्या या आवडत्या अभिनेत्रीं बद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !

550

बॉलीवूडच्या कलाकारांसंबंधितले किस्से प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले सत्य जाणून घेण्याची इच्छा सर्व प्रेक्षकांना असते. त्यामुळेच काही वेळेस अशी सत्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षक रियालिटी शो जास्त बघतात. जर तुम्हालाही तुमच्या आवडीच्या बॉलीवुड कलाकारांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला माहित नसतील.
माधुरी दीक्षित –
माधुरी दीक्षितला बॉलीवुड मधील एक उत्कृष्ट अभिनेत्री मानले जाते. त्यांच्या एका हसण्यामुळे न जाणो किती मनावर त्या राज्य करीत असतील. त्यांची प्रत्येक अदा ही घायाळ करणारी असते. त्यामुळेच माधुरी दीक्षित मल्टी टॅलेंटेड अभिनेत्री आहे असे सर्वजण म्हणतात.
१९९४ मध्ये आलेल्या हम आपके है कौन या चित्रपटासाठी त्यांनी २,७५,३५,७२९ रुपये दिले गेले होते. तसेच आजपर्यंत फिल्मफेअर अवॉर्ड साठी माधुरी दीक्षितची सर्वाधिक वेळा निवड झाली आहे. आतापर्यंत माधुरी दीक्षितला तेरा वेळा या पुरस्कारासाठी नॉमिनेट केले गेले आहे.

विद्या बालन –
सध्याच्या काळात विद्या बालन ही एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सुरुवातीच्या काळी विद्या बालन ने संघर्षाला तोंड दिले. तिने जीवनात अनेक निराशांना झेलले. विधू विनोद चोप्रा यांच्या परिणीता या चित्रपटासाठी विद्या बालनला ४० स्क्रीन टेस्ट आणि १७ मेकअप टेस्ट द्याव्या लागल्या होत्या.
त्यानंतर विधू यांनी विद्याला चित्रपटासाठी साइन केले. विद्याने तिच्या करिअरची सुरुवात सर्फ एक्‍सेल च्या जाहिरातीपासून केली होती.

हे वाचा – विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा सुंदर आणि बोल्ड सीन द्यायला आहे खूप प्रसिद्ध !

प्रियंका चोपडा –
एकेकाळी विश्वसुंदरी असलेली प्रियांका चोप्रा सध्या बॉलिवूड सोबतच हॉलीवूड मध्ये सुद्धा नाव कमवीत आहे. प्रियंका चोपडा ही अशी एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिला युएसए च्या National opus honour choir ने सन्मानित केले आहे.
जेपी दत्त यांनी उमराव जान या चित्रपटासाठी प्रियांकाला ऑफर केली होती मात्र तिने तिच्या ब्लफ मास्टर या चित्रपटासाठी जेपी दत्ता यांची ऑफर नाकारली. त्यानंतर हा चित्रपट ऐश्वर्या रायला ऑफर करण्यात आला आणि ती या चित्रपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून दिसली होती.
कॅटरिना कैफ –
कॅटरीनाने वयाच्या १४ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. कॅटरीनाने एका ज्वेलरी ब्रँडसाठी मॉडेलिंग करून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. कॅटरीनाला बुद्धिबळ खेळायला खूप आवडते. कॅटरीनाला भारतातील सर्वाधिक फोटो काढणारी महिला असे मानले जाते.

हे वाचा – मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !सोनाक्षी सिन्हा –
दबंग चित्रपटातून तेरे मस्त मस्त दो नैन असे म्हणत प्रेक्षकांना दिवाने बनवणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या अभिनयाचा आधी साधेपणाच्या जोरावर बॉलिवूडमधील सुपरस्टार बनली आहे. सोनाक्षी सिन्हा अक्षय कुमारला तिचे इंस्पिरेशन मानते.

सोनाक्षीने तिच्या दबंग चित्रपटाची कमाई सलमान खानचा बिंग ह्यूमन फाउंडेशनला डोनेट केली होती.

हे वाचा – या भारतीय क्रिकेटरचे करियर झाले फ्लॉप पण नशिबाने झाले राजकुमारी सोबत लग्न !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !