अक्षय कुमार बद्दलची हि गोष्ट वाचून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल !

524

बॉलिवूडचा सर्वात लाडका अभिनेता अक्षय कुमार हा त्यांच्या चित्रपटामुळे प्रसिद्ध असतोच त्याशिवाय ते त्यांच्या समाजकार्यामुळे सुद्धा लोकप्रिय आहेत. प्रत्येक वेळी काही ना काही करणे हे त्यांचे व्रत असते. यंदा सुद्धा अक्षय अश्या एका महत्वाच्या कारणामुळे चर्चेत आहेत. चला तर जाणून घेऊया काय कारण आहे ते..

बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार यांनी आपला चित्रपट लक्ष्मी बॉम्बचे चित्रीकरण पुर्ण केले आहे. या चित्रपटात ते पहिल्यांदा तृथीयपंथाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय अक्षय पुन्हा एकदा आपल्या समाजकार्यामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि दिग्दर्शक राघव लॉरेंस चेन्नईमध्ये तृथीयपंथांसाठी घरे बांधणार आहेत. राघव यांनी आपल्या सोशल मीडिया वरून याची माहिती दिली आहे. त्यांनी तृतीयपंथाना आश्रय देणाऱ्या नवीन योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. सोबतच अक्षय यांना १.५ कोटी रुपये दान केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद सुद्धा मानले आहेत.अक्षय यांनी या समुदायासाठी दीड कोटी रुपये दान केले आहे.

राघव लॉरेन्स यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये अक्षय कुमारच्या गळ्यात माळा परिधान केलेला फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहले आहे. नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांसोबत एक चांगली बातमी शेअर करू इच्छितो आहे.दिग्दर्शक यांनी फेसबुकवर लिहले कि, मी प्रत्येकाचे आभार मानत आहे.ज्यांनी परमेश्वराच्या रुपात आमची मदत केली. म्हणून आता अक्षय कुमार सर आमच्या करीता परमेश्वर समान आहेत. या योजनेनिम्मित एवढं मोठे योगदान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. आमच्या ट्रस्टचे पुढील पाऊल हे तृतीयपंथांचे पुनर्वसन आणि भारतभरात त्यांचा करीता घरे बांधणे हे असणार आहे. सगळ्या तृतीयपंथांकडून मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे.आपणास सांगू इच्छितो कि, लक्ष्मी बॉम्ब एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय यांची भूमिका एक तृतीयपंथ आत्माच्या वशमध्ये करून घेतात. अहवालानुसार अक्षय या चित्रपटात एक अशी भूमिका साकारत आहे, ज्यात एक तृतीयपंथाची आत्मा आपल्यात वशमध्ये करते. हा चित्रपट यावर्षी ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.