वाजिद खान यांनी जाता जाता सलमान खानला दिली हि शेवटची भेट !

705

प्रसिद्ध म्युझिक कंपोजर वाजिद खान यांचे अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण कोरोनाव्हायरस आणि किडनी विकार असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांची किडनी ट्रान्सप्लांट केली होती. मात्र त्या ट्रान्सप्लांट दरम्यानच त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले. वाजिद यांच्या मृत्यूमुळे साजिद-वाजिद ही सुप्रसिद्ध जोडी तुटली. वाजिद यांच्या जाण्याच्या बातमीमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. त्यांच्या जाण्याच्या बातमीमुळे त्यांचा सर्वात जवळील मित्र सलमान खान सुद्धा खूप दुःखी झाला आहे. सलमान खानने ट्विट करून त्याच्या जवळील मित्राच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
वाजिद खान यांच्या मृत्यूनंतर एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे जाण्यापूर्वी वाजिद खान यांनी त्यांच्या मित्राला म्हणजे सलमान खानचा एक भेट देऊन गेले. ती म्हणजे वाजिद खान यांचे शेवटचे गाणे आपल्याला सलमान खानच्या राधे: यू आर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटात पाहण्यास मिळेल. साजिद वाजिद यांची जोडी आपल्याला सलमान खानच्या अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसली होती. या जोडीला पहिला ब्रेक सुद्धा सलमान खानच्या चित्रपटामधून मिळाला होता.
या लॉक डाऊन दरम्यान साजिद-वाजिद या जोडीने सलमान खान साठी भाई भाई हे गाणे सुद्धा कंपोस्ट केले होते. मीडिया रिपोर्टनुसार राधे: यू आर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटाचे निर्माते अतुल अग्निहोत्री यांनी सांगितले की या चित्रपटाचे टायटल सॉंग खूप धमाकेदार असेल. या गाण्याच्या ट्रॅकला साजिद-वाजिद यांनी कंपोज केले आहे. या गोष्टीचा खुलासा त्यांनी वाजिद खान यांच्या मृत्यूनंतर दिला.
यासोबतच अतुल अग्निहोत्री यांनी सांगितले की राधे: यू आर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत त्यातील दोन गाणी साजिद-वाजिद यांनी कंपोज केली आहेत. यातील एक टायटल ट्रॅक आहे तर दुसरे या चित्रपटातील सर्वात रोमँटिक गाणे आहे. या दोघांची गाणी खूप चांगली असतात आणि ती ऐकल्यावरच लोकांच्या मनात नक्कीच घर करतील.