आइटम सॉंगवर परफॉर्मन्स करण्यासाठी या अभिनेत्रींनी घेतात तब्बल एवढे मानधन !

2626

तुम्हाला माहित आहे का दिल से या चित्रपटातील छय्या छय्या हे गाणे, दबंग मधील मुन्नी बदनाम हुई, तीस मार खान मधील शीला कि जवानी, आणि बंटी और बबली या चित्रपटातील कजरारे कजरारे या गाण्यांमध्ये काय कॉमन आहे ते? आम्हीच तुम्हाला सांगतो चित्रपटांमधील ही गाणी आइटम सॉन्ग आहेत. शिवाय या गाण्यांमुळे ते चित्रपट गाजले असे बोलायला ही हरकत नाही. काहीवेळा तर चित्रपट त्यांच्या कथेमुळे नव्हे तर त्यातील गाण्यांमुळे चालतात. आजही अनेक चित्रपटांमध्ये तुम्हाला आइटम सॉन्ग बघायला मिळतात.
पुढील काही आठवड्यात प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला बागी थ्री या चित्रपटात दिशा पटानी ने एक आयटम्स सॉंग केली आहे. परंतु काही कारणास्तव हे आइटम सॉन्ग वादात सापडले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आइटम सॉन्ग वर परफॉर्मन्स करण्यासाठी भरगोस फी घेतली.

कॅटरिना कैफ – चिकणी चमेली – अग्निपथ या चित्रपटात संजय दत्त आणि रितिक रोशन यांनी दमदार अभिनय केला होता. परंतु हा चित्रपट अजून एका कारणामुळे चर्चेत राहिला तो म्हणजे या चित्रपटांमधील आइटम सॉन्ग चिकणी चमेली. या गाण्यामध्ये अभिनेत्री कटरीना कैफ ने तिचा बोल्ड अंदाज सादर केला होता. या गाण्यामध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी कटरीना कैफ ने त्यावेळी ३.५ करोड रुपये फी घेतली होती.
प्रियंका चोपडा – राम चाहे लीला, लीला चाहे राम – दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा अभिनय असलेला रामलीला गोलियों की रासलीला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामध्ये एक आइटम सॉन्ग देखील होते. या सॉंग मध्ये प्रियंका चोपडाने परफॉर्मन्स केला होता. या परफॉर्मन्ससाठी प्रियंकाने निर्मात्यांकडून सहा करोड रुपये फी घेतली होती.
सनी लियोनी – बेबी डॉल – सनी लियोनी याआधी अनेक चित्रपटांमध्ये आइटम सॉन्ग करताना दिसली आहे. तिचे बेबी डॉल हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. या गाण्यावर परफॉर्मन्स करण्यासाठी सनीने निर्मात्यांकडून तीन करोड रुपये घेतले होते.
सोनाक्षी सिन्हा- पार्टी ऑल नाईट – अक्षय कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांचा अभिनय असलेला बॉस या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने पार्टी ऑल नाईट आइटम सॉन्ग वर डान्स केला होता. या गाण्यावर परफॉर्मन्स करण्यासाठी सोनाक्षीने निर्मात्यांकडे पाच करोड रुपयांची मागणी केली होती. हे गाणे सुपरहिट सिंगर हनी सिंग ने गायले आहे.
जॅकलीन फर्नांडिस- एक दोन तीन – बॉलिवूडची प्रसिद्ध अशी मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने गाजवलेले गाणे म्हणजे एक दोन तीन. त्यावेळी हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. त्यानंतर बागी २ या चित्रपटात या गाण्याचा रिमेक करण्यात आला. यावेळी या गाण्यावर जॅकलीन फर्नांडिस ने परफॉर्मन्स केले. या गाण्यावर परफॉर्मन्स करण्यासाठी जॅकलीनने २ करोड रुपये फी घेतली होती.
करीना कपूर खान- हलकट जवानी – बेबोने म्हणजेच करीना कपूर खान ने हलकट जवानी या गाण्यावर परफॉर्मन्स करण्याकरिता ५ करोड रुपये घेतले होते.